Home Breaking News महसूल फेरफार प्रकरनांच्या लोक अदालतीचे आयोजन

महसूल फेरफार प्रकरनांच्या लोक अदालतीचे आयोजन

63

महसूल फेरफार प्रकरनांच्या लोक अदालतीचे आयोजन



नितेश केराम
कोरपना : जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख प्रदीप जगताप चंद्रपूर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील उप अधीक्षक भूमी अभिलेख चंद्रपूर / भद्रावती / वरोरा,/ चिमूर / ब्रह्मपुरी / नागभीड /सिंदेवाही / मुल/ पोंभुर्णा / गोंडपिपरी / बल्लारपूर / राजुरा / कोरपना / जिवती यांना महसुली फेरफार प्रकरनांची लोक अदालत आयोजित करणेबाबतचे पत्र दिले आहे
मा उपसंचालक भूमी अभिलेख नागपूर प्रदेश यांच्या दि 10 सप्टेंबर 2025 रोजीच्या सभेतील सुचनेनुसार मा महसुल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रलंबित फेरफार प्रकरनांसंबंधाने लोक अदालत आयोजित करने बाबत सूचना दिलेल्या आहेत
मा महसुल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे हे दि 20 सप्टेंबर 2025 रोजी चंद्रपूर जिल्ह्यात विविध विभागांची आढावा सभा घेणार आहेत त्यामुळे महसुल फेरफार प्रकरनांच्या विषया संबंधाने आढावा घेण्याची शक्यता नाकारता येत नाही
त्या संबंधाने जिल्ह्यातील सर्व उप अधिक्षक भूमी अभिलेख यांनी बुधवार दि 20 सप्टेंबर 2025 पूर्वी आपले स्तरावरील प्रलंबित सर्व फेरफार प्रकरणा संबंधाने फेरफार अदालत घ्यावी असे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख चंद्रपूर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व उप अधीक्षक भूमी अभिलेख यांना पत्राद्रारे सूचित केले आहे
त्या अनुषंगाने उप अधीक्षक भूमी अभिलेख कोरपना श्री प्रभाकर बढिये यांनी दि 17 सप्टेंबर 2025 रोजी फेरफार प्रकरनांच्या लोक अदालतीचे उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यलय कोरपना येते 11 वाजता आयोजन केले आहे फेरफार प्रकरण लोक अदालती मध्ये निकाली काढली जाणार असल्यामुळे जनतेनी जास्त जास्त फायदा घ्यावा असे आवाहन उप अधीक्षक भूमी अभिलेख कोरपना श्री प्रभाकर ना बढिये यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here