घुग्घूस : शहरातील आठवडी बाजार हा प्रसिद्ध असून रविवारी बाजारा करीता अनेक गावातील व्यापारी व नागरिक घुग्घूस शहरात येत असतात.
नगरपरिषद तर्फे आठवडी बाजारातील व्यापाऱ्याकडून तसेच गुजरी व्यापऱ्या कडून दुकान लावण्या करीता शुल्क घेतल्या जाते. मात्र सुविधेच्या नावावर तोंडावर पाने पुसले जातात. बाजारात जागोजागी खड्डे पडलेले असून यात पाणी व चिखल जमा झाल्यामुळे व्यापाऱ्यांना दुकान लावणे जड जाते तर नागरिकांना बाजारात भाजी – पाला घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना चिखलातून जावे लागत असल्यामुळे नागरिक प्रचंड त्रस्त झालेले आहेत.
काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस नेते दिपक पेंदोर यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांना निवेदनातून समस्या सोडणवीण्याची मागणी केली आहेत.