विकासाच्या सुसाट ‘ट्रिपल इंजिन’साठी भाजपला मताशिर्वाद घ्या! – आमदार देवराव भोंगळे

14

विकासाच्या सुसाट ‘ट्रिपल इंजिन’साठी भाजपला मताशिर्वाद घ्या! – आमदार देवराव भोंगळे



आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे भव्य शक्तीप्रदर्शन; नगराध्यक्षपदासाठी राधेश्याम अडाणीया यांचा अर्ज दाखल.*


राजुरा, दि. १७
राजुरा नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वाखाली भव्य पदयात्रा काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. नगराध्यक्ष आणि २१ नगरसेवक पदांसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षपदाकरिता राधेश्याम अडाणीया यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केला.
या नामांकणाकरीता भाजप कार्यकर्त्यांच्या जोशपूर्ण उत्साहात स्थानिक भवानी मंदिरातून निघालेल्या पदयात्रेचे कर्नल चौकात समारोप झाले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विजयाचा संकल्प करण्यात आला.
यावेळी ठिकठिकाणी आमदार देवराव भोंगळे यांनी नागरिकांशी संवाद साधत ‘विकासाचे व्हिजन’ स्पष्ट केले आणि विरोधकांच्या नगर विकास आघाडीवर सडकून टीका केली.
आमदार देवराव भोंगळे म्हणाले की, “जे दोन पक्ष आयुष्यभर एकमेकांविरोधात लढले, ते आज केवळ सत्तेच्या स्वार्थासाठी आणि पराभवाच्या भीतीने एकत्र आले आहेत. ही आघाडी म्हणजे फक्त स्वार्थासाठी केलेली तडजोड आहे.” त्यामुळे शहरातील सुज्ञ मतदारांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये.
पुढे बोलताना, तुम्ही मला भरघोस मतदान देऊन विधानसभेत पाठवले, त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. आता दुसरी विनंती आहे. शहराचा विकास करण्यासाठी ‘ट्रिपल इंजिन’ सरकार आवश्यक आहे. त्यासाठी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राधेश्याम अडाणीया आणि सर्व २१ ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राधेश्याम अडाणीया यांचेसह प्रभाग क्र. १ येथून ना. मा. प्र. सर्वसाधारण प्रवर्गातून आकाश गंधारे, सर्वसाधारण (महिला) प्रवर्गातून सौ. मयुरी पहानपटे तर प्रभाग क्र. २ येथून अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गातून मंगेश सीताराम दुर्गे व सर्वसाधारण (महिला) प्रवर्गातून सौ. किरण भट्टपल्लीवार तर प्रभाग क्र. ३ येथून अनुसूचित जमाती (महिला) सर्वसाधारण प्रवर्गातून सौ. मनीषा टेकाम व सर्वसाधारण प्रवर्गातून भाजपचे शहराध्यक्ष सुरेश रागीट तर प्रभाग क्र. ४ येथून ना. मा. प्र. सर्वसाधारण प्रवर्गातून सौ. प्रीती रेकलवार व सर्वसाधारण प्रवर्गातून श्री. अमोल चिल्लावार तर प्रभाग क्रमांक ५ येथून अनुसूचित जमाती सर्वसाधारण भूपेश मेश्राम व सर्वसाधारण (महिला) प्रवर्गातून सौ. रजिया बेगम बाबा बेग तर प्रभाग क्र. ६ येथून ना. मा. प्र. (महिला) प्रवर्गातून सौ. सविता शेरकी व सर्वसाधारण प्रवर्गातून श्री. प्रभाकर येरणे, प्रभाग क्रमांक ७ येथून ना. मा. प्र. सर्वसाधारण प्रवर्गातून प्रफुल कावळे व सर्वसाधारण (महिला) प्रवर्गातून सौ. निलिमा साळवे तर प्रभाग क्र. ८ येथून ना. मा. प्र. (महिला) प्रवर्गातून सौ. माया धोटे व सर्वसाधारण प्रवर्गातून श्री. रविंद्र डाहुले तर प्रभाग क्रमांक ९ येथून अनुसूचित जाती (महिला) सौ. प्रियदर्शनी उमरे व ना. मा. प्र. सर्वसाधारण प्रवर्गातून सचिन भोयर व सर्वसाधारण (महिला) प्रवर्गातून मनीषा रामगिरवार तर
प्रभाग क्रमांक १० येथून अनुसूचित जाती (महिला) सौ. महेश्वरी मेश्राम व सर्वसाधारण प्रवर्गातून श्री. नितिन सिडाम यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.
या नामांकन पदयात्रेला आमदार देवराव भोंगळे यांच्या सुविद्य पत्नी सौ. अर्चना भोंगळे, राजुरा भाजपचे तालुकाध्यक्ष वामन तुराणकर, गोंडपिपरीचे अध्यक्ष दिपक सातपुते, माजी जि. प. सभापती सुनील उरकुडे, शहर महामंत्री मिलिंद देशकर, सचिन डोहे, तालुका महामंत्री दिलीप गिरसावळे, हरिदास झाडे, अजय राठोड, बाळनाथ वडस्कर, बापुराव मडावी, भाऊराव बोबडे, सचिन बल्की, प्रफुल घोटेकर, स्वरूपा झंवर, उज्ज्वला जयपुरकर, ममता केशेट्टीवार, योगिता भोयर, लक्ष्मी बिस्वास, रेश्मा चव्हाण, शांता कदम, शुभांगी रागीट, सुरेश धोटे, विनोद नरेन्दुलवार, प्रदिप पाला, राजकुमार डाखरे, सुशिल कल्लुरवार यांचेसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here