Home Breaking News अवैधरित्या जनावर (गौवंश) ची वाहतुक करणाऱ्या इसमांविरुध्द कारवाई

अवैधरित्या जनावर (गौवंश) ची वाहतुक करणाऱ्या इसमांविरुध्द कारवाई

52

अवैधरित्या जनावर (गौवंश) ची वाहतुक करणाऱ्या इसमांविरुध्द कारवाई

कत्तली साठी वाहतुक व बांधुन ठेवलेल्या एकुण २० जनावर (गौवंश) ची सुटका

दोन पिकअप वाहनासह एकुण २४,००,०००/- रुपयाची माल जप्त

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ची कामगिरी

चंद्रपुर: दिनांक ०८ डिसेंबर, २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पथकाने मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी हद्दीत दोन पिकअप वाहने थांबवुन पंचासमक्ष तपासणी केली असता त्यात एकुण ०६ नग गोवंशीय जनावरे (बैल) कत्तली करीता अवैधरित्या वाहतुक करुन नेत असतांना मिळुन आल्याने दोन्ही वाहनाच्या चालकांकडे विचारपुस करुन त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी जावुन खात्री केली असता सदर दोन्ही ठिकाणावर एकुण १४ नग गोवंशीय जनावरे (बैल) बांधुन ठेवलेले मिळुन आले. सदर आरोपीचे ताब्यातुन एकुण २० जनावरे किं. अं.६,००,०००/- रु. आणि दोन पिकअप वाहने किं. अं. १८,००,०००/- असा एकुण २४,००,०००/- रु. चा माल मिळुन आल्याने सदर आरोपी नामे मिलींद जितेंद्र कोवे वय २० वर्ष रा. उदापुर ब्रम्हपुरी (२) अफसर अली सय्यद वय ३३ वर्ष रा. ब्रम्हपुरी आणि पाहिजे असलेला आरोपी नामे (३) पहेलवार रा. ब्रम्हपुरी याचेविरुध्द पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे अपराध क्रमांक ६३६/२०२५ कलम ११(१) (घ) (ड) (च) (ज) प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० व कलम ५ (अ), ५ (ब), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व सहकलम ४९ भारतीय न्याय संहिता-२०२३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई श्री मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि श्री संतोष निंभोरकर, पोहवा जयंत चुनारकर, पोअं. अजीत शेन्डे, नितेश महात्मे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here