Home Breaking News बैलबंडीचे लोखंडी चाक, ट्रॅक्टरचे लोखंडी पट्टे चोरीचा गुन्हा उघड पोलीस स्टेशन भद्रावती...

बैलबंडीचे लोखंडी चाक, ट्रॅक्टरचे लोखंडी पट्टे चोरीचा गुन्हा उघड पोलीस स्टेशन भद्रावती ची कामगिरी

69

बैलबंडीचे लोखंडी चाक, ट्रॅक्टरचे लोखंडी पट्टे चोरीचा गुन्हा उघड पोलीस स्टेशन भद्रावती ची कामगिरी



भद्रावती: दि.25/09/25 रोजी पोलीस ठाणे भद्रावती अप क्रमांक 545/25 कलम 303(2), 317(2), 3(5) BNS मधील फिर्यादी नामे पंकज राजकुमार देवतळे 29 वर्ष रा. जेना ता. भद्रावती यांनी तक्रार दिली की, बैलबंडीचे चार लोखंडी चाक किं. 16000/- रु. तसेच दोन ट्रॅक्टरचे पाच लोखंडी हायड्रोलिक पट्टे कि. 10000/- रु. असा एकूण 26000/- रु. चा माल अज्ञात चोरट्यांनी रात्र दरम्यान चोरून नेला
रिपोर्टवरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला असता सदर गुन्ह्यातील मुद्देमाल 1) बैलबंडीचे चार लोखंडीचा किं. 16000/-रु. 2) दोन ट्रॅक्टरचे पाच लोखंडी हायड्रोलिक पट्टे कि. 10000/-रु. 3) गुन्ह्यात वापरलेले वाहन एक पांढऱ्या रंगाची फोर्ड फिगो कंपनीची क्र. MH34-AM-2618 कि. 250000/-रु.असा एकूण 2,76,000/-रु. चा माल आरोपी नामे 1) विनोद उर्फ बिल्लू देवगडे वय 58 वर्ष रा. आंबेडकर वार्ड, भद्रावती 2) वैभव महादेव दगडी, वय 29 वर्ष, रा. जेना ह.मु. महाकाली मंदिर, भिवापूर वार्ड, चंद्रपूर यांच्याकडून हस्तगत करून गुन्हा उघड करण्यात आला
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा श्री संतोष बाकल यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांचे नेतृत्वात पोलीस ठाणे भद्रावती गुन्हे शाखा पथकातील पो. उपनी गजानन तुपकर, महेंद्र बेसरकर, जगदीश झाडे, अनुप आस्टुनकर, विश्वनाथ चौधरी, गोपाल आतकुलवार, योगेश घाटोळे, रोहित चिडगिरे, खुशाल कावळे, संतोष राठोड पोलीस ठाणे भद्रावती यांनी केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here