Home Breaking News अवैधरित्या जनावर (गौवंश) ची वाहतुक करणाऱ्या इसमांविरुध्द कारवाई

अवैधरित्या जनावर (गौवंश) ची वाहतुक करणाऱ्या इसमांविरुध्द कारवाई

51

अवैधरित्या जनावर (गौवंश) ची वाहतुक करणाऱ्या इसमांविरुध्द कारवाई

कत्तली साठी नेत असलेल्या एकुण ३४ जनावर (गौवंश) ची सुटका

आयशर वाहनासह एकुण ३३,६५,०००/- रुपयाचा माल जप्त

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ची कार्रवाई

चंद्रपुर : दिनांक १२ डिसेंबर, २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पथकाने मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी हद्दीत खरबी टोल प्लाझा येथे नाकाबंदी करुन एक आयशर क्रमांक एम.एच.४०-सी.टी.७८९२ सापळा रचुन पकडला व पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यात एकुण ३४ नग गोवंशीय जनावरे (गाई, बैल) कत्तली करीता अवैधरित्या वाहतुक करुन नेत असतांना मिळुन आल्याने सदर आरोपी नामे सरगम गुलाबसिंह धुर्वे वय ३३ वर्ष रा. शिवनी (मध्यप्रदेश) आणि पाहीजे असलेला आरोपी तौसिफ खान रा. नागपूर व इतर याचे विरुध्द पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे अपराध क्रमांक ६४७/२०२५ कलम ११ (१) (घ) (ड) (च) (ज) प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० व कलम ५ (अ), ५ (ब), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व सहकलम ४९ भारतीय न्याय संहिता-२०२३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असुन आरोपीचे ताब्यातुन एकुण ३४ नग गोवंशीय जनावरे (गाई, बैल) कि. अं.८,५०,०००/- रु. आणि एक आयशर क्रमांक एम.एच.४०-सी.टी.७८९२ कि. अं.२५,००,०००/- रु. व आरोपीचा मोबाईल किं. अं. १५,०००/- असा एकुण ३३,६५,०००/- रु.चा माल जप्त करण्यात आला. पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत.

सदरची कारवाई श्री मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि श्री संतोष निंभोरकर, पोहवा नितेश महात्मे, गणेश भोयर, पोअं. अजीत शेन्डे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here