Home Breaking News शहरातील बंद घरांची रेकी करुन घरफोडी करणारा परराज्यातील आरोपीस अटक.

शहरातील बंद घरांची रेकी करुन घरफोडी करणारा परराज्यातील आरोपीस अटक.

31

शहरातील बंद घरांची रेकी करुन घरफोडी करणारा परराज्यातील आरोपीस अटक…

चोरीतील १९,८४,०००/- रुपयाचा माल जप्त

पोलीस स्टेशन रामनगर ची कामगिरी

चंद्रपूर शहरात मालमत्तेविरुध्द गुन्हयांना प्रतिबंध करुन दाखल गुन्हे उघडकीस आणणे बाबत पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार पोलीस ठाणे रामनगर चे पोलीस निरीक्षक  आसिफराजा शेख यांनी त्यांच्या अधिपत्याखालील गुन्हे शोध पथकास घरफोडी व चोरी करणारे चोरांबाबत गोपनिय माहिती काढुन गुन्हयांची उकल करण्याबाबत सुचीत केले असता अशा प्रकारच्या दाखल गुन्हयाची माहिती काढली असता पोस्टे हद्दीतील अप.क्र.१०३५/२०२५ व १०३६/२०२५ या दोन्ही घरफोडीचे गुन्हे एकाच पध्दतीने व एकाच वेळी झाल्याचे निदर्शनास आल्याने त्याबाबत तांत्रिक पध्दतीने तपास कार्य व गोपनिय यंत्रणा सक्रीय करुन मिळालेल्या खात्रीशिर माहिती मिळाली की, उत्तरप्रदेश येथील रहिवासी नामे मुस्तकीन मो. शौकीन चौधरी वय ४३ वर्ष रा. समर गार्डन कॉलनी मेरठ ह.मु. नेहरु शाळे मागे चंद्रपूर हा घराची दारे खिडक्या बसविण्याचे व दुरुस्तीचे काम करण्याच्या बहाण्याने शहरात फिरुन बंद घरे पाहुन त्याचेकडील कार मधुन येऊन गुन्हे करीत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सदर इसमावर गोपनियरित्या पाळत ठेवुन तो चोरीचा मुद्देमाल कब्जात घेवुन विक्रीसाठी जात असतांना त्यास मुद्देमालासह ताब्यात घेऊन पंचासमक्ष त्याचेकडुन एकुण १९,८४,०००/- रु. किंमतीचे सोन्या-चांदीचे दागीने व गुन्हयात वापरलेली चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

सदरची कामगिरी श्री मुम्मका सुदर्शन-पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे-अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री प्रमोद चौगुले उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. रामनगर चे पोलीस निरीक्षक श्री आसिफ राजा शेख यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री देवाजी नरोटे, श्री हनुमान उगले, श्री निलेश वाघमारे, पो.अं. लालु यादव, शरद कुडे, आनंद खरात, बाबा नैतमा, रामप्रसाद नैताम, जितेंद्र आकरे, मनिषा मोरे, पंकज ठोंबरे, रविकुमार ढेंगळे, संदिप कामडी, प्रफुल्ल पुप्पलवार, सुरेश कोरवार, ब्ल्युटी साखरे व पंकज पोंदे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here