चनई बु येथे आदिवासी पारंपरिक ढेमसा मंडळ भगवान बिरसा कला संगम स्पर्धेत राज्यात दुसरे या निमित्त आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चंद्रपूरच्या वतीने सत्कार संम्पण
चनई बु येथे आदिवासी पारंपरिक ढेमसा मंडळ भगवान बिरसा कला संगम स्पर्धेत राज्यात दुसरे या निमित्त आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चंद्रपूरच्या वतीने सत्कार संम्पण
नितेश केराम
विदर्भ शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रम शाळा संघ विदर्भातील 9 प्रकल्पाचे वतीने विविध शालेय क्रीडा स्पर्धा व विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन व उदघाटन दि 13/12/2025 रोज शनिवारला आदिवासी विकास विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आले या मध्ये या कार्यक्रमाचे उदघाटन आयुषी सिंग मॅडम उपायुक्त नागपूर आदिवासी विकास विभाग यांच्या हस्ते पार पडले यावेळी विकासजी राचलवार जिल्हा प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग व आदिवासी समाजातील सामाजिक पदाधिकारी व इतर 9 प्रकल्पाचे अधिकारी कर्मचारी व विध्यार्थी चंद्रपूर शहर व ग्रामीण मधून उपस्थित होते त्यावेळी भगवान बिरसा कला संगम 15 वी जयंती निमित्त राज्यस्तरीय स्पर्धेत दि्वितीय पारितोषिक रोख 2 लक्ष पटकविणाऱ्या चनई बु कोरपना येतील पारंपरिक ढेमसा मंडळाला राज्यस्तरीय भगवान बिरसा कला संगम या मध्ये दि्तवीय पारितोषिक पटकविल्या बद्दल चंद्रपूर जिल्हा आदिवासी विभागाच्या वतीने एक लक्ष रुपये चेक देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आदिवासी सेवक वाघुजी गेडाम भाजपा जमाती मोर्चाचे जिल्हा ध्यक्ष अरुण मडावी प्रमोद कोडापे जिल्हा प्रभारी संयोजक भगवान बिरसा कला संगम चंद्रपूर मनोज तुमराम ता अध्यक्ष जमाती मोर्चा कोरपना संदीप मडावी गट प्रमुख व आदी कलावंत संच उपस्थित होते