Home Breaking News भद्रावती येथे बंद घरातुन चोरी केलेला आरोपी पोलीसच्या ताब्यात 

भद्रावती येथे बंद घरातुन चोरी केलेला आरोपी पोलीसच्या ताब्यात 

38

 

भद्रावती येथे बंद घरातुन चोरी केलेला आरोपी पोलीसच्या ताब्यात

घुग्घुस :  दिनांक १९.१२.२०२५ रोजी फिर्यादी नामे तनुज अनिल पंढीले वय ३० वर्षे, धंदा-ठेक्केदारी, ह.मु. देवालय कॉलनी भद्रावती यांनी पोस्टे भद्रावती येथे रिपोर्ट दिली की, दि. १८/१२/२०२५ रोजी सकाळी परीवारासह यवतमाळ येथे लग्नाकरीता गेले व रात्रौ ०८.०० वा. दरम्यान घरी परत आले असता त्यांना त्यांचे बंद घरातील एक सोन्याचे हातातील ब्रासलेट व पर्स मधील नगद रक्कम ३,५०,०००/-रु. दिसुन न आल्याने पो.स्टे. भद्रावती येथे येवुन अज्ञात ईसमा विरूध्द तक्रार दिल्याने पो.स्टे. भद्रावती येथे अप क्र. ७७९/२०२५ कलम ३०५(अ), ३३१(३),३३१ (४) भा. न्या. सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

गुन्हा दाखल होताच पोलीस स्टेशन भद्रावती चे गुन्हे शोध पथकांनी पोस्टे परीसरात आपले मुखबीर लावून गुप्त माहिती काढुन आरोपी नामे बंटी सुभाषचंद्र बद्रा वय ४४ वर्ष, रा. वार्ड नं. ४, संतनगर, खापरखेडा नागपूर ह.मु. संताजी नगर भद्रावती यास ताब्यात घेवुन गुन्हया संबधाने सखोल तपास केला असता सदर आरोपींने गुन्हयातील मुद्देमाल चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यास गुन्हयात अटक करून त्याचेकडुन पंचासमक्ष १) एक सोन्याचा ब्रासलेट वनज १५.९३० ग्रॅम किं. १,४८,००० व २) नगद रक्कम ५०,०००/-रु. जप्त भद्रावती पोलीसांनी जप्त केला व उर्वरीत ३,००,०००/-रु. आपले वैयक्तीक बँक अकाउंट बँक ऑफ बडोदा भद्रावती येथे जमा केल्याचे पावती हस्तगत करण्यात आले आहे. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन सा., मा. अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे सा., उप वि. पोलीस अधिकारी संतोष बाकल सा, यांचे मार्गदर्शनात पो.नि. योगेश्वर पारधी, सपोनि. संजय मिश्रा, गुन्हे शोध पथकातील पोउपनि गजानन तुपकर, महेंद्र बेसरकर, अनुप आष्टुनकर, विश्वनाथ चुदरी, गोपाल आतकुलवार, जगदिश झाडे, संतोष राठोड, खुशाल कावळे, योगेश घाटोडे, प्रेम बावनकर यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here