Home Breaking News महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन – ०२ जानेवारी

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन – ०२ जानेवारी

41

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन – ०२ जानेवारी

दिनांक ०२ जानेवारी रोजी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन साजरा करण्यात येतो. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र अविरतपणे कार्य करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे.

आपल्या कर्तव्यनिष्ठा, शिस्त, धैर्य आणि त्यागाच्या बळावर महाराष्ट्र पोलीस दलाने समाजात सुरक्षितता व विश्वास निर्माण केला आहे. नैसर्गिक आपत्ती, सण-उत्सव, निवडणुका तसेच विविध आव्हानात्मक परिस्थितींमध्ये पोलीस दलाने बजावलेली भूमिका प्रशंसनीय आहे.

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. जनतेच्या सेवेसाठी त्यांचे कार्य सदैव असेच प्रेरणादायी राहो, हीच सदिच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here