Home Breaking News प्रहार जनशक्ती पार्टी तर्फे आंदोलन संदर्भाने वाहन धारकांना सुचना

प्रहार जनशक्ती पार्टी तर्फे आंदोलन संदर्भाने वाहन धारकांना सुचना

49

प्रहार जनशक्ती पार्टी तर्फे आंदोलन संदर्भाने वाहन धारकांना सुचना

नागरिकांना आव्हान करण्यात येते की, दिनांक ०३/०१/२०२६ रोजी सकाळी १०:०० ते सांयकाळी ०५:०० वा. पर्यंत नागभिड शहरात प्रहार जनशक्ती पार्टी तर्फे त्यांचा विविध मांगण्या करिता आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर आंदोलनात जिल्हयातील व जिल्ह्याबाहेरील मोठया संख्येने नागरिक सहभागी होत आहेत. सदर आंदोलन नागभिड येथे मुख्य शहरात असुन आंदोनामुळे नागभिड ते वडसा (गडचिरोली) मार्गवर वाहतुकीची समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. सदर आंदोलामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होवु नये तसेच आंदोलनातील नागरिक व इतर वाहन चालकांमध्ये वाद निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणुन या मार्गावरील सर्व वाहतुक बंद ठेवणे आवश्यक आहे. करिता नागरिकांनी शक्तो या मार्गाचा वापर करण्यास टाळावे.

नागरिकांनी तसेच जड वाहतुकीधारानी नागभिड ते वडसा गडचिरोली मार्ग-नागभिड ते सिंदेवाही या मार्गचा वापर अत्यावश्यक कामाशिवाय करू नये. आंदोलनाच्या कालावधीत सर्व वाहतुकदारांनी पुढील पर्यायी मार्गाचा वापर करावा.

१) नागपुर, भंडारा कडुन नागभिड मार्गे वडसा, गडचिरोली कडे जाणाऱ्या सर्व नागरिकांनी निलजफाटा-पवणी-लाखांदूर-वडसा या मार्गचा वापर करतील.

२)वरोरा, भिसी, चिमुर कडुन नागभिड मार्गे वडसा, गडचिरोली कडे जाणाऱ्या सर्व नागरिकांनी शंकरपुर-नेरी-सिंदेवाही-मुल-सावली मार्गाचा वापर करावा.

३)चंद्रपूर, मुल, सावली कडुन नागभिड मार्गे वडसा, गडचिरोली कडे जाणाऱ्या सर्व नागरिकांनी मुल-सावली या मार्गचा वापर करतील.

४) चंद्रपूर, मुल, सिंदेवाही कडुन नागभिड मार्गे नागपुर कडे जाणाऱ्या सर्व नागरिकांनी सिंदेवाही-नेरी-शंकरपूर-काम्पा टेम्पा या मार्गचा वापर करतील.

तरी नागरीकांनी आंदोलन दरम्यान वरील पर्यायी मार्गचा वापर करून शांतता व सुव्यवस्था अबाधीत राखणे कामी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here