वणी येथे कॉमरेड शंकरराव दानव स्मृतिदिनानिमित्त वैचारिक प्रबोधन
विविध विषयांवर होणार मान्यवरांचे मार्गदर्शन
३१ जानेवारी रोजी होणार प्रबोधनात्मक कार्यक्रम
______________________________
वणी : शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी जनतेचे व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ शंकरराव दानव यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त वणी येथील वसंत जीनिंग सभागृहात वैचारिक प्रबोधनाचा कार्यक्रम दिनांक ३१ जानेवारी रोज शनिवारला होणार आहे. कार्यक्रमाला जास्तीत जास्तीत शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी जनतेने उपस्थित रहावे असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेचा जिल्हा कमिटीने केले आहे.
कॉ शंकरराव दानव यांच्या ७२ वर्षाचा जीवन प्रवासात त्यांनी विद्यार्थी जीवनापासूनच कष्टकऱ्यांचा प्रश्नांसाठी स्वतःला वाहून घेतले. त्यांनी या करिता स्वतःचा घराकडे सुद्धा दुर्लक्ष केले. कॉ. शंकरराव यांनी यवतमाळ जिल्ह्यात भूमिहीन १००० च्या वर लोकांना शेतजमिनीचे पट्टे मिळवून दिले. अश्या या नेत्याला ज्या विचाराने घडविले त्या विचाराला समजून घेण्यासाठी आणि आज देशासमोर असलेल्या प्रश्नांना समजून त्याचा निराकरणासाठी काय करता येऊ शकते ह्या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी प्रागतिक विचारवंत प्रभू राजगडकर( नागपूर) हे “वन जमिनीवरील आदिवासींचे अस्तित्व आणि त्यांच्या अधिकारावर होणारे भांडवली विकासाचे अतिक्रमण” ह्या विषयावर तर अरुण लाटकर ( नागपूर) हे “राजकारणातील धार्मिक, भांडवली शिरकाव आणि जनतेचा अधिकारावर घाला” तसेच यशवंत झाडे हे “देशाचे शेतकी धोरण आणि शेतकऱ्यांचा आत्महत्या” आदी विषयांवर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वसंत जिनिंगचे संचालक प्रमोद वासेकर व संविधानिक हक्क परिषदेचे अध्यक्ष गीत घोष हे उपस्थित राहणार आहेत.
“कॉ शंकरराव दानव : व्यक्तित्व आणि संघर्ष” या होणाऱ्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाला जास्तीत जास्त जनतेनी उपस्थित राहून वैचारिक प्रबोधनाचा लाभ घ्यावा असे आवाहन माकपचे जिल्हा सचिव कॉ ॲड कुमार मोहरमपुरी, किसान सभेचे रा क सदस्य कॉ ॲड दिलीप परचाके, जिल्हा अध्यक्ष कॉ चंद्रशेखर सिडाम, जिल्हा सचिव माजी जि प सदस्य कॉ देविदास मोहकर, माजी प स सभापती ॲड डी बी नाईक, मनीष इसाळकर, गजानन ताकसांडे, सदाशिव आत्राम, रामभाऊ जिद्देवार, किसन मोहूरले, कवडू चांदेकर, उषा मुरखे, अनिता खुनकर, सुरेखा बिरकुलवार, प्रीती करमणकर, पुंडलिक ढुमने, सुधाकर सोनटक्के, श्रीकांत तांबेकर, ऋषी कुलमेथे, एकनाथ नालमवार, आदींनी केली आहे.