Home Breaking News वनसडीच्या 12 महिलांचा वर्ल्ड रेकॉर्ड लावणी त दमदार सहभाग

वनसडीच्या 12 महिलांचा वर्ल्ड रेकॉर्ड लावणी त दमदार सहभाग

50

वनसडीच्या 12 महिलांचा वर्ल्ड रेकॉर्ड लावणी त दमदार सहभाग



नितेश केराम
कोरपना तालुक्यातील वनसडी येतील 12 महिलांनी चंद्रपूर येथे उत्कृष्ट महिला मंच तर्फे आयोजित गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्ड लावणी उपक्रमात उत्साह पूर्ण सहभाग नोंदवून गावाचे नाव उज्वल केले पारंपरिक वेषभूषेत आणि तालबद्ध सादऱीकरणातून या महिलांनी लावणीच्या ठेक्यावर प्रेक्षकांची मने जिंकली
या उपक्रमात प्रीती पराग जका ते जोया शेख साक्षी आस्वले नवनीता कार ललिता गेडाम सोनू आस्वले वैशाली आस्वले प्रियंका थेरे पौर्णिमा काकडे धनश्री मडावी विशू अंबिका या महिलांचा समावेश होता
महाराष्ट्रच्या लोककलेचा वारसा जपण्यासाठी आणि महिलांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य कार्यक्रमात तीन हजार हुन अधिक महिला सहभागी झाल्या होत्या यामध्ये वनसडीच्या महिलांनी आत्मविश्वासाने सादरीकरण करत गावाचा मान ऊंचावला
या यशाबद्दल गावात आनंदाचे वातावरण असून ग्रामस्थांनी सर्व सहभागी महिलांचे अभिनंदन केले आहे ग्रामीण भागातील महिलांनी मोट्या व्यासपीठावर आपली कला सादर केल्यामुळे इतर महिलांनाही प्रेरना मिळत आहे त्यांना सचिन गोगले सीमा गोगले ( गडचांदूर ) यांनी प्रशिक्षण दिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here