Home Breaking News अज्ञात हॅकर द्वारे घुग्घूस नगरपरिषदेचे उपाध्यक्ष राजुरेड्डी यांचा व्हाट्सअप हॅक

अज्ञात हॅकर द्वारे घुग्घूस नगरपरिषदेचे उपाध्यक्ष राजुरेड्डी यांचा व्हाट्सअप हॅक

252

अज्ञात हॅकर द्वारे घुग्घूस नगरपरिषदेचे उपाध्यक्ष राजुरेड्डी यांचा व्हाट्सअप हॅक



बँक ऑफ इंडियाच्या नावाने APK लिंक पाठवून नागरिकांच्या फसवणूकीचा प्रयत्न


घुग्घूस : शहर काँग्रेसचे अध्यक्ष नगरपरिषदेचे उपाध्यक्ष तथा पाणी पुरवठा सभापती राजुरेड्डी यांचा व्हाट्सअप क्रमांक अज्ञात हॅकरने हॅक करून शहरातील अनेक नागरिकांना बँक ऑफ इंडियाशी संबंधीत एक पोस्ट पाठवीत असून यासोबतच एक (apk ) लिंक पाठविल्या जात आहे.

ही लिंक ओपन केल्यास ओपन करणाऱ्यांची बँकेतील रक्कम लंपास केल्या जाऊ शकते यासोबतच त्यांच्या व्हाट्सअप वरील खाजगी माहितीचा गैरवापर होऊ शकतो रेड्डी हे काही महत्वाच्या कामानिमित्त बाहेर असल्यामुळे सदर गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच नगराध्यक्ष दिप्ती सोनटक्के, स्वच्छता व वैद्यकीय सभापती नूरूल सिद्दीकी, काँग्रेस नेते सैय्यद अनवर, काँग्रेस जिल्हा महासचिव अलीम शेख,गजानन मासिरकर,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, तालुका महासचिव विशाल मादर, आयुष आवळे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here