इन्फंट कॉलेजचा युवराज तुम्मेवार जिल्ह्यातून प्रथम गुवंतांचा माजी आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते गौरव
नितेश केराम
राजुरा इयत्ता बारावी परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात इन्फंट जिजस सोयाटीद्रारा संचालित इन्फंट जिजस सायन्स कॉलेज राजुरा येतील विद्यार्थ्यांनी 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली असून युवराज सुभाष तूम्मेवार याने 94’17 टक्के गुण मिळवून जिल्ह्यातून प्रथम क्र पटकावित संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे तसेच महाविद्यालयातून हेमांगी सुनील पायपरे हिने 84’50 टक्के गुणांसह आरती शंकर पहानपटे हिने 84’17टक्के गुनासह तृतीय क्र मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले याशिवाय ओम किरण लांडे 82’17 % याने चौथा तर निशांत नीलकंठ गोहने 80’33 याने पाचवा क्र प्राप्त करून महाविद्यालयाचे नाव उज्वल केले आहे
विद्यार्थ्याच्या या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे संस्थापक माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या हस्ते सर्व यशस्वी विध्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला त्यांनी युवराज तुम्मेवार सह सर्व गुणवंतांचे कौतुक करून अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेचे अध्यक्ष अभिजित धोटे प्राचार्य प्राध्यापकवृंद यासह अनेक मान्यवर उपस्थित होते