Home Breaking News आधुनिक हळद लागवड तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना मिळाली नवी दिशा

आधुनिक हळद लागवड तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना मिळाली नवी दिशा

23

आधुनिक हळद लागवड तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना मिळाली नवी दिशा



घुग्घुस, दि. ३ जून: लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनच्या वतीने शेतकरी प्रशिक्षण केंद्र, मुरसा येथे बुधवार, दि. ३ जून रोजी “हळद लागवड तंत्रज्ञान” या विषयावर विशेष शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणास परिसरातील २० शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला, शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांबरोबरच अधिक उत्पादनक्षम व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पिकांकडे वळविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांतर्गत २० निवडक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्रत्यक्ष हळद प्रात्यक्षिक (डेमोन्स्ट्रेशन) प्लॉट विकसित करण्यात येणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांना हळद लागवडीचे संपूर्ण तांत्रिक मार्गदर्शन देण्यात आले, प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्यांना ‘सेलम’ जातीच्या हळदीचे बियाणे उपलब्ध करून देण्यात आले. ही जात अधिक उत्पादनक्षम असून बाजारपेठेत तिची मोठी मागणी असल्याने शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता या जातीमध्ये आहे. कार्यक्रमात हवामान व जमिनीची निवड, योग्य वातावरण, बियाण्यांची निवड, बीजप्रक्रिया, जैविक प्रक्रिया, सेंद्रिय व रासायनिक खत व्यवस्थापन, सिंचन व्यवस्थापन, रोग व कीड व्यवस्थापन तसेच उत्पादन वाढीसाठी आवश्यक आधुनिक तंत्रज्ञान यांसारख्या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करून त्यांना प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी आवश्यक तांत्रिक माहिती देण्यात आली, या प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ. आदित्य कदम, व्यवस्थापक, शेतकरी प्रशिक्षण केंद्र, मुरसा यांनी प्रमुख मार्गदर्शक व प्रशिक्षक म्हणून उपस्थित राहून शेतकऱ्यांना आधुनिक हळद लागवड तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्यासाठी वैज्ञानिक शेती पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन केले, या उपक्रमामागील मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण व लाभदायक शेती पद्धती स्वीकाराव्यात, उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवावे तसेच तयार करण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिक प्लॉटना भेट देऊन इतर शेतकऱ्यांनीही या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून आपल्या शेतामध्ये त्याची अंमलबजावणी करावी हा आहे. प्रशिक्षणानंतर सहभागी शेतकऱ्यांना हळदीच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले, या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. महेंद्र वैरागडे (वरिष्ठ अधिकारी), श्री. महेश उपरे (अधिकारी) व श्री. मानस मकासरे (कनिष्ठ अधिकारी) यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. गजानन बोबडे, श्री. अभिजित चौधरी, श्री. आदित्य मोहितकर व श्री. धनंजय पिंपळशेंडे यांचे विशेष सहकार्य लाभले, या उपक्रमामुळे परिसरात हळद लागवडीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार होऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here