विदर्भ राज्य आंदोलन समिती शेतकरी संघटना तालुका राजुरा
नितेश केराम
राजुरा येथे शेतकरी संघटना शेतकरी महिला आघाडी शेतकरी युवा आघाडी व स्वतंत्र पक्षाच्या सर्व नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्याची संयुक्त बैठक शनिवार दि 11 जुलै 2026 रोजी दुपारी 12 वाजता सानेगुरूजी सभागृह राजुरा येथे शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी आमदार ऍड वामनरावजी चटप यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरनातं पार पडली यावेळी मनच्यावर जेष्ठ नेते अरुण पा नवले जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना नीलकंठराव को्रांगे जिल्हाध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष शेषराव बोन्डे जिल्हा उपाध्यक्ष शेतकरी संघटना कपिल इड्डे तालुकाध्यक्ष शेतकरी संघटना सुनील बावणे जिल्हा उपाध्यक्ष अमोल देवाळकर तालुकाध्यक्ष शेतकरी युवा आघाडी दिलीप देरकर उपाध्यक्ष नगर परिषद राजुरा नगरसेवक रमेश नळे किशोर हिंगाने तसेच श्री चौधरी सर यांची प्रमुख उपस्थिती होती
बैठकीस तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मोट्या. संखेने युवा सहकारी उपस्थित होते सर्वानी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून बैठकीची शोभा वाढविली बैठकीच्या पारंभी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या महिला अध्यक्षा स्व रंजनाताई ममर्डे माजी विधान परिषद सदस्य प्रा बी टी देशमुख तसेच तालुक्यातील दिवंगत कार्यक्त्यांना भावपूर्ण सर्द्धांजली अर्पण करण्यात आली
यानंतर दि 25 जुलै 2026 रोजी सिंदखेडराजा जी बुलढाणा येते विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आयोजित विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा यशस्वी करण्यासाठी आवश्यक पूर्व तयारी जनजागृती आणि तालुक्यातून मोट्या संखेने नागरिकांचा सहभाग सुनिस्त करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली
तसेच दि 9 ऑगस्ट 2026 क्रन्तिदिन रोजी नागपूर येते आयोजित दीक्षाभूमी ते संविधान चॊक विदर्भ लॉंग मार्च तसेच दुपारी 1:30 ते 5:00 या वेळेस संविधान चॊक येते होणाऱ्या जनसंकल्प मेळाव्याच्या नियोजनाबाबत विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले या ऐतिहासिक आंदोलनास राजुरा तालुक्यातून विकर्मी लोकसहभाग नोंदविन्यासाठी गावागावात जनसम्पर्क कार्यलय उघडन्यात आले आहे