Home Breaking News सोन्याचे दागिने चोरी करणारे टोळीना अटक करून, सोन्याचे दागिने सोबत 6 लाख...

सोन्याचे दागिने चोरी करणारे टोळीना अटक करून, सोन्याचे दागिने सोबत 6 लाख 85 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आले

98

सोन्याचे दागिने चोरी करणारे टोळीना अटक करून, सोन्याचे दागिने सोबत 6 लाख 85 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आले

वरोरा : पोलीस स्टेशन वरोरा येथे दि.17 जुलै रोजी फिर्यादि शरद सिताराम गुधाने, वय(-53) रा. टेंभुर्डा ता. वरोरा यांनी थान्यात जबानी रिपोर्ट दिली की, फिर्यादि व त्यांची पत्नी हे त्यांचे उघडे शटर असलेल्या चहाच्या दुकानात झोपुन असतांना, अज्ञात आरोपीतांनी, फिर्यादिच्या चहाच्या दुकानातील 

1)269 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (-6,72,500 रू )
2)1,00000 रू नगदी 
3)एक कोको कम्पनीचा मोबाईल (8,000 रू.असे एकूण 7,80,500 रू.चा माल चोरून नेला. अश्या फिर्यादिच्या जबानी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन वरोरा येथे कलम 305 भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

वरील गुन्हयाच्या तपासा दरम्यान वरोरा येथील डि.बी पथाकाने, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर व पोलीस स्टेशन कोरपना यांच्या मदतीने, तपासचे चक्र फिरवुन, गोपनिय माहीती वरून, आरोपीस 24 तासांत ताब्यात घेउन, आरोपीकडुन पिसीआर च्या दरम्यान, फिर्यादिकडुन चोरलेले 1) आठ सोन्याची अंगठी 2) 4 सोन्याच्या बांगडया 3) एक सोन्याची चपला कंठी 4) एक जोड सोन्याचे कानातले 5) दोन सोन्याची पोत 6) एक सोन्याचा गोफ एकुण सोन्याचे दागिने 7) 2 मोवाईल 8) गुन्हयात वापरलेली शिवरलेट स्पार्क कार क्र.एम.एच.34 ए.ए.3324, ६) गुन्हयात वापरलेली अँक्टीव्हा क्र.एम.एच.31 ई. व्ही. 9188 असा एकुण-6,85,000 रू.चा माल करून उर्वरीत आरोपीकडुन बाकी आहे

ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव1) प्रदिप संजय शेरकुरे, 2) आकाश नारायण शेरकुरे 3) चिंतामण संजय शेरकुरे 4) सौ. हरीणा प्रदिप शेरकुरे 5) सौ. मायाबाई देवगडे, सर्व रा. पारधी गुडा, धोपटाळा, ता कोरपना 6) विकास काळे रा.चिनोरा पारधी गुडा, ता.वरोरा यांच्या कडुन पि.सी. आर. दरम्यान जप्त करण्यात आला. तसेच फरार आरोपी अटक करून, गुन्हयातील उर्वरीत मुदद्देमाल जप्त करणे बाकी आहे.

सदर ही कारवाई मुमक्का सुदर्शन, पोलीस अधिक्षक चंद्रपुर, रिना जनबंधु, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपुर, नयोमी साटम, सहायक पोलीस अधिक्षक, वरोरा, महेश कोन्डावार, पो.नि., स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर, अजिंक्य तांबडे, पोलीस निरीक्षक वरोरा यांचे मार्गदर्शनाखाली, सपोनि विनोद जांभळे, पोस्टे वरोरा, सपोनि मनोज गदादे, स्थागुशा, चंद्रपुर, सपोनि विकास गायकवाड, पो.स्टे. कोरपना, तसेच पोलीस स्टेशन वरोरा येथील डि.बी. पथकातील पो.हेड.कॉ. दिपक दुधे, पो.अं.संदिप मुळे, विशाल राजुरकर, महेश गावतुरे, मोहन निषाद, राजु लोधी, यांनी स्थानिक गुन्हे शाखा व पो.स्टे. कोरपना येथील पोलीस स्टॉफच्या मदतीने करण्यात आली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here