Home Breaking News विवेक बोढे यांच्या प्रयत्नातून घुग्घुस शहरात विविध ठिकाणी लागणार हायमास्ट लाईट

विवेक बोढे यांच्या प्रयत्नातून घुग्घुस शहरात विविध ठिकाणी लागणार हायमास्ट लाईट

73

विवेक बोढे यांच्या प्रयत्नातून घुग्घुस शहरात विविध ठिकाणी लागणार हायमास्ट लाईट



घुग्घुस : शहरातील अनेक ठिकाणचे लाईट बंद होते त्यामुळे अंधार पसरलेला होता याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. लोकनेते ना. सुधीर मुनगंटीवार व जि.प. चे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या पुढाकारातून विविध ठिकाणी हायमास्ट लाईट व स्ट्रीट लाईट लावण्यात येणार आहे.

त्या अनुषंगाने भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी वार्ड वासियांसह सिद्धार्थ बुद्ध विहार केमिकल नगर, मच्छी मार्केट, संत गोरोबा काका मंदिर कुंभार मोहल्ला, विठ्ठल मंदिर देवस्थान, साई नगर वावरे यांच्या घराजवळील ओपन स्पेस, सारीपुत्त बुद्ध विहार, हनुमान मंदिर बहादे प्लॉट, ग्रामीण रुग्णालयाचा मागील रस्ता, बाबा भंगार ते बहादे प्लॉट रस्ता, हिंदू स्मशानभूमीचा आतील रस्ता या परिसराची पाहाणी केली तसेच हनुमान मंदिर, बहादे प्लॉट येथे जागेची पूजा करण्यात आली. या ठिकाणी हायमास्ट लाईट व स्ट्रीट लाईट लावण्यात येणार आहे.

यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, शिवसेना शहराध्यक्ष महेश डोंगे, भाजपाचे सतीश बोन्डे, तुलसीदास ढवस, प्रवीण ठाकरे, मनोज खोबरे, निशांत ठाकरे, उमेश वाणी, सुरेखा वाणी, मारोती मांढरे, अमोल नागपुरे, ललित होकम, योगेश होकम, हेमंत पाझारे, बालू नांदे, रामचंद्र टोंगे, श्रीहरी डोहे, विठ्ठल खिरटकर, रंजित गाडगे, सचिन क्षीरसागर, संजय कुचणकर, मनोज नागतुरे, किशोर ठेंगणे आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here