मुल शहरात प्रतिबंधीत नॉयलॉन मांजा विक्रेतावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
चंद्रपुर :
स्थानिक गुन्हे शाखेमधील अधिकारी व अंमलदार मुल शहरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्तबातमीदार यांचेकडुन माहिती मिळाली की, बाजार चौक मुल परीसरात अंकुश बोडखे हा पंतग उडविण्यासाठी नॉयलॉन मांजाची लपुन विकी करीत आहे, अशा माहितीवरून प्रसाद कॉम्पलेक्स, बाजार चौक, मुल येथे रेड केली असता त्याचे मालकीचे गोडाउनमध्ये विविध रंगाच्या प्लास्टिक चक्रीवर गुडांळलेला प्रतिबंधीत नॉयलॉन मांजा धागा असलेल्या चकया एकुण ४३ नग, असा एकुण ३९,१००/- रू माल मिळुन आल्याने पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी अंकुश नंदकिशोर बोडखे, वय ३१ वर्ष, व्यवसाय – करण किराणा दुकान, मुल रा. वॉर्ड १४, स्टेट बँकचे मागे, मुल, ता.मुल, जि. चंद्रपूरयाने मालकीचे गोडाउनमध्ये पतंग उडविण्यासाठी तयार करण्यात येणारा प्रतिबंधीत नॉयलॉन मांजा धागा अवैधरित्या विकी करीता साठवुन ठेवला तसेच नमुद प्रतिबंधीत नॉयलॉन मांजा धागा हा मानवी जिवितास तसेच पर्यावरण, पक्षी यांना घातक व धोकादायक असल्याचे माहिती असुन सुध्दा जाणिवपुर्वक स्वतःचे आर्थिक फायदयासाठी विक्रीकरीता ताब्यात वाळगले आहे. करीता त्याचेविरूध्द पोलीस स्टेशन मुल येथे भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३,२९२.२९३ सहकलम ५.१५ पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे मुल करीत आहे.
सदरची कारवाई मा.श्री. सुदर्शन मुम्मका पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्रीमती रिना जनबंधु अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात श्री. महेश कोंडावार, पोलीस निरीक्षक यांचे नेतुत्वात श्री. बलराम झाडोकार सहायक पोलीस निरीक्षक, श्री संतोष निंभोरकर पोलीस उप निरीक्षक, पोहवा/नितिन साळवे, पोहवा / सुभाष गोहोकार, अंमलदार मिलिंद जांभुळे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे.










