Home Breaking News माणिकगढ कपंनीला नाहक त्रास आणी वाढता कामगार आक्रोश

माणिकगढ कपंनीला नाहक त्रास आणी वाढता कामगार आक्रोश

80

माणिकगढ कपंनीला नाहक त्रास आणी वाढता कामगार आक्रोश

नितेश केराम
मागील काही दिवसापासून माणिकगढ सिमेंटच्या माईन्स क्षेत्रात सुरु असलेल्या आंदोलन आता गतिमान होत असून या आंदोलनामुळे कपंनीतील नियमित कामगार अधिकारी व त्यांच्या कुटुंबावर गँभीर परिणाम होत आहे सिमेंट उत्पादनासोबत सामाजिक विकास व कामगार कल्याणासाठी सतत झटणाऱ्या या कपंनीला वेठीस धरले जात असल्याचा आरोप आता कामगार युनियनकडून करण्यात येत आहे
माणिकगढ सिमेंट कपंनी मागील 40 ते 45 वर्षापासून गडचांदूर परिसरात कार्यकरत असून सर्व कायदेशीर शासन प्रक्रिया पार पाहूनच भूसंपादन केलेले आहे बांबेझरी शिवरातील माईन्स क्षेत्रात वन विभाग महसूस विभाग तहसील कार्यलय जिल्हाधिकारी कार्यालय एसडीओ राजुरा यांच्या उपस्थितीत अलीकडे सर्वेक्षण करण्यात आले या सर्वेक्षणात माईन्स क्षेत्र वन जमिनीतच येते आणि कपंनीकडे आवश्यक ती सर्व कागद पत्रे उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले
तरीही काही राजकीय व आर्थिक स्वार्थी गटाकडून आदिवासी बांधवांना भडकवून तसेच बाहेरून लोक आणून आंदोलन छेडले जात आहे जवळपास चार दशकांनंतर अचानक भूसंपादनाचा मुद्दा उचलून धरला जात आहे यामागे कोणते हेतू कार्यकरत आहेत हा प्रश्न उपस्थित केला जात आहे
या आंदोलनामुळे केवळ प्रशासन नवे तर माईन्समध्ये वास्तव्यास असलेले कुटुंब व नियमित कामगार त्रास्थ झाले आहेत आंदोलनाकडून कपंनीच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ मारहाण मालमत्तेची जाळपोळ व तोडफोड करण्यात येत आहे या प्रकारांमुळे कामगारांमध्ये असंतोष वाढला असून ते आता खुलेपणाने आंदोलनकत्याच्या विरोधात उभे राहत आहे
सततच्या आंदोलनामुळे उत्पादन ठप्प झाले असून याचा थेट फटका शेकडो कामगारांना बसत आहे त्याचा रोजीरोटीचा प्रश्न गँभीर बनत चालला आहे या पार्शभूमीवर माणिकगड सिमेंट कामगार व कर्मचारी यांनी आता माईन्स येते ठिय्या आंदोलन सुरु केले आहे आम्हला काम करू द्या अशी मागणी त्यानी केली असून कपंनी प्रशासनाला आपला पठिंबा दर्शवला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here