नितेश केराम कोरपना येथे आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती तसेच सर्व आदिवासी सामाजिक संघटनांच्या वतीने भव्य जनआक्रोश मोर्चा गुरुवार दि 9 रोजी काढण्यात आला सदर मोर्चाची सुरुवात कोरपना बस्टाप येथून करण्यात आली मोर्चामध्ये राजुरा जिवती आणि कोरपना तालुक्यामधून हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते हा मोर्चा शांततेत तहसील कार्यलयावर पोहचला येथे झालेल्या सभेमध्ये यांसह अनेक आदिवासी नेत्यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले व शासनविरोधात संताप व्यक्त केला नेत्यांनी आपल्या भाषनात सांगितले की महाराष्ट्र शासनाने घेतलेले काही निर्णय हे आदिवासी समाजाच्या हकांवर घाला घालणारे आहेत शासनाने बंजारा व धनगर समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करू नये आदिवासिंच्या जमिनी भाडे तत्वावर देणे आणि गौन खनिज संपत्तीवर अधिकारी काढून घेण्याचा निर्णय रद्द करावा शासनाने दि 12 जुलै 2024 शासन परीपत्रकाचा रद्द करून दि 12 एप्रिल 2010 चे परिपत्रक कायम ठेवावे रूपापेठ येथील आश्रम शाळेला केंद्रीय एकलव्य विद्यालयाचा दर्जा देऊन 1ते 12 वी पर्यंत शिक्षणाची व्यवस्था करावी पेसा अनुसूचित क्षेत्रात सेवानिवृत्ती शिक्षकांना न घेता पात्र उमेदवारांना शिक्षणपदी नियुक्ती द्यावी 50 टक्यावरून अधिक आदिवासी वस्ती असलेल्या गाव वाडी गुडे वस्तीना पेसा क्षेत्रात समाविष्ट करावे अशी मागणी ही यावेळी करण्यात आली मोर्चा शांततेत पार पडला असून सर्व मागण्याचे निवेदन कोरपना तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडनवीस यांना पाठविण्यात आले व मोर्चामुळे सम्पूर्ण परिसरात हकांसाठी हा मोर्चा इथसिक ठरला आहे मोर्चा साधारण पणे पार पडला आयोजनात आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती चे कार्यकर्ते विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते व तरुण पिढी मोट्या संख्येने उपस्थित होते