Home Breaking News ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पंचायत समिती जिवती येथे आमरण उपोषण

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पंचायत समिती जिवती येथे आमरण उपोषण

105

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पंचायत समिती जिवती येथे आमरण उपोषण



नितेश केराम
दि 31/10/2025 रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेना NGP 5825 चे राज्याध्यक्ष श्री विलास भाऊ कुमरवार साहेब यांच्या नेतृत्वात तालुका जिवती येथे ग्रामपंचायत कर्मचारी यांचे विविध मागण्यासाठी पंचायत समितीस्तरावर एक दिवशीय आमरण उपोषण आयोजित केल होत जिवती तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी कोरपना तालुका तसेच राजुरा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांनी पाठींबा जाहिर केला
ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या प्रमुख मागणे
1) ग्रामपंचायत कडील पगारातील तफावत रक्कम
2) भविष्य निर्वाह निधीचे थकीत रक्कम
3) कोरोना प्रोत्साहन भत्ता
4) थकीत राहणीमान भत्ता
5) सेवा पुस्तकं अद्यावत करणे
6) अपघात विमा काढून मिळने
इत्यादी मागण्या घेऊन पंचायत समिती जिवती येथे अमरण उपोषणाला जिवती तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही असा ग्रामपंचायत कर्मचारी यांनी निर्धार केला जर ग्रामपंचायत स्तरावर या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर येणाऱ्या भविष्य या येणाऱ्या काळात या पेक्षा मोठे काम बंद आंदोलन करू असा इशारा ग्रामपंचायत कर्मचारी यांनी दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here