Home Breaking News *राजुरा मतदारसंघासाठी २ कोटींच्या विकासकामांना मंजुरी.*

*राजुरा मतदारसंघासाठी २ कोटींच्या विकासकामांना मंजुरी.*

98

राजुरा मतदारसंघासाठी २ कोटींच्या विकासकामांना मंजुरी.



आमदार देवराव भोंगळे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश.


राजुरा, दि. १०
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना सन २०२५-२६ अंतर्गत राजुरा विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये ०२ कोटी रुपयांच्या विकासकामांना शासनाने मंजुरी दिली आहे. आमदार श्री. देवराव भोंगळे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही कामे मार्गी लागली असून, यामध्ये सिमेंट काँक्रिट रस्ते, बंदिस्त नाल्या आणि सामाजिक सभागृहांचा समावेश आहे.

या निधीमुळे मतदारसंघातील राजुरा, कोरपना, गोंडपिपरी व जिवती या चारही तालुक्यांतील अनेक लोकावश्यक विकासकामांना आता गती मिळेल.

राज्याच्या समाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने हा निधी मंजूर केला असून, शासनाने दि. २० ऑक्टोबर रोजी याबाबतचा शासन निर्णय (GR) काढला आहे.
त्यानुसार राजुरा तालुक्यातील सोंडो येथे समाजिक सभागृह बांधकाम करणे, लक्कडकोट येथे अंतर्गत रस्ता बांधकाम करणे, कोरपना तालुक्यातील जेवरा येथील भारत वाघोसे ते पंढरी टिपले यांच्या घरापर्यंत सी. सी. रोड बांधकाम करणे, तांबाडी येथील निर्दोष कोल्हे ते युवराज वनकर यांच्या घरापर्यंत बंदिस्त नाली बांधकाम करणे, बाखर्डी येथील गणेश धुळे ते बुद्धविहारपर्यंत सी. सी. रोड बांधकाम करणे, बाखर्डी येथील रमेश तेलंग ले अशोक मिसळकर यांच्या घरापर्यंत सी. सी. रोड बांधकाम करणे, नांदा येथील राकेश टिपले ते मेन रोडपर्यंत बंदिस्त नाली बांधकाम करणे, नांदा येथील मलाई कोरवत ते शर्मिला रासेकर यांचे घरा पर्यंत सी. सी. रोड बांधकाम करणे, जिवती तालुक्यातील मरकलमेटा येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे, नारायणगुडा येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे, कोट्टा येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे, केकेझरी येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे, गुडशेला येथे खुले सभागृह बांधकाम करणे, मांगगुडा येथे खुले सभागृह बांधकाम करणे, दमपुर मोहदा येथे अण्णाभाऊ साठे चौकाचे सौंदर्यीकरण करणे, गोंडपिपरी तालुक्यातील बोरगांव येथील रुमदेव उराडे यांच्या घरापासून ते मेन रोड पर्यंत सि.सी. रोड बांधकाम करणे,सोनापूर देशपांडे येथील नानाजी कांबळे यांच्या घरापासून ते बुद्धविहार ते रणजीत खोब्रागेडे सि.सी. रोड चे बांधकाम करणे, तोहोगाव येथील छाया दुर्गे यांच्या घरापासून ते सज्जन ताडे यांच्या घरापर्यंत सि.सी रोड बांधकाम करणे, चेकपारगांव येथील बुद्धविहार ते गौतम मानकर यांच्या घरापर्यंत सि.सी. रोड बांधकाम करणे, सूपगाव येथील मारोती मेश्राम यांच्या घरापासून ते संतोष वनकर यांच्या घरापर्यंत सि.सी. रोड बांधकाम करणे, आक्सापूर येथील सुरज फुलझेले यांच्या घरापासून ते रंजना तावाडे यांच्या घरापर्यंत सि.सी. रोड बांधकाम करणे, चेक विठ्ठलवाडा येथील मेन रोड ते इतिहास मेश्राम यांच्या घरापर्यंत सि. सी. रोड बांधकाम करणे आणि चेकनांदगाव येथील बुद्धविहाराला संरक्षण भिंत बांधकाम करणे या विकासकामांचा यात समावेश आहे.

आमदार देवराव भोंगळे यांच्या अथक प्रयत्नातून हा निधी उपलब्ध झाल्याने या भागातील नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा मिळणार आहेत आणि दलित वस्तीच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे, त्यासाठी मतदारसंघातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here