Home Breaking News आगामी वरोरा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण...

आगामी वरोरा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक

46

 

आगामी वरोरा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक

(दि.९ ) ला वरोरा येथे पार पडली. या बैठकीला उपस्थित राहून न. प. निवडणूक संदर्भात विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे काम अधिक प्रभावीपणे व्हावे, यासाठी बूथरचना, प्रभागानुसार नियोजन, मतदारांशी संवाद वाढविणे यासारख्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या प्रभाग निहाय कामकाजाबाबत माहिती दिली. आगामी निवडणुकीसाठी जनसंपर्क मोहीम, घरपोच संपर्क, प्रचार साहित्य, तसेच जनतेसाठी योजनांची माहिती पोहोचविणे अशा पुढील कामकाजा विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.
  1. यावेळी माझ्यासमवेत आमदार करण देवतळे, सीडीसीसी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, निवडणूक प्रमुख रमेश राजुरकर , शहराध्यक्ष संतोष पवार, डॉ.सागर वझे यांचेसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here