
विकासाभिमुख कार्य करण्यासाठी जनता भाजपच्या पाठीशी—-आमदार देवराव भोंगळे
*आंबेझरी येथे काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर पक्षप्रवेश*
जिवती : समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जनता भाजपच्या पाठीशी आहे. नागरिकांचा विश्वास, अपेक्षा आणि समर्थन आमच्या कार्याला अधिक गती देणारे आहे. गावागावात मूलभूत सुविधांचा विस्तार करणे हा आमचा मुख्य अजेंडा आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ समाजातील शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचावा हेच आमचे ध्येय असून त्यासाठी भाजपाचे सरकार सदैव कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.
जिवती तालुक्यातील आंबेझरी येथे काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला.यावेळी आमदार भोंगळे बोलत होते.
आमदार भोंगळे पुढे म्हणाले, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मान.नरेंद्रजी मोदी व राज्याचे लाडके मुख्यमंत्री मान. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात विकासकामांचा धडाका सुरू असून सर्वांगीण विकासासाठी जनता आता भाजपच्या सोबत असल्याची ग्वाही आमदार देवराव भोंगळे यांनी दिली.
यावेळी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेल्या नवप्रवेशित कार्यकर्त्यांमध्ये भीमराव आत्राम,अर्चना शिंदे, शोभा मडावी, रामचंद्र सलगर ,रामराव नंदेवार, भीमराव आत्राम, धर्मा मडावी, आनंदराव आत्राम , प्रकाश शिंदे , हनुमान नंदेवार, विलास कंदीलवार,पांडुरंग नंदेवार, बापूराव आत्राम, गणपत सलगर यांचा समावेश आहे.
यावेळी आमदार देवराव भोंगळे यांनी नवप्रवेशित कार्यकर्त्यांचे स्वागत करीत भाजपच्या ध्येय, धोरणाविषयी माहिती देत शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
याप्रसंगी भाजयुमो जिल्हाध्यक्ष महेश देवकते, तालुकाध्यक्ष दत्ता राठोड, जिल्हा उपाध्यक्ष केशव गिरमाजी, तालुका महामंत्री गोविंद टोकरे, शहराध्यक्ष राजेश राठोड, तुकाराम वारलवार, अंबादास कंचकटले, चंद्रकांत घोडगे, आनंद कदम, संतोष जाधव,पुंडलिक गिरमाजी,भीमराव पवार , विठ्ठल चव्हाण,रामराव राठोड, सूर्यभान मडावी, दत्ताजी बावणे, पुंजाराम, भिकाजी कोटरंगे यांचेसह भाजपा कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










