
घुग्घुस येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त प्रहार जनशक्ती पक्षाचा प्रेरणादायी उपक्रम..
घुग्घुस शहरामध्ये आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने एक हृदयस्पर्शी व प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला. समाजातील प्रत्येक घटकाप्रती सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांग बांधवांच्या सन्मानासाठी झालेले हे औचित्यपूर्ण आयोजन उपस्थितांच्या मनाला भिडणारे ठरले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक अभिवादन करून दि. ०३ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या या कार्यक्रमास प्रहाराचे अमोल नथ्थुजी मांढरे अध्यक्षस्थानी होते. गावातील दिव्यांग बंधू-भगिनींचा शॉल देऊन, लाडू व छोटेखानी भेटवस्तू देत सन्मान करण्यात आला. त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि आत्मविश्वासाचा प्रकाश हा समाजातील संवेदनशीलतेचा आणि परस्पर सहकार्याचा सुंदर संदेश देऊन गेला.
या सन्मान सोहळ्यास अमोल नथ्थुजी मांढरे यांच्यासह इरफान शेख, सुभाष मांढरे, पवन निशाद, शारदा संजय झाडें, संजना ढोरके, महेश कामतवार, दिव्यांग बांधव गणेश कामतवार, अतुल सोंडुले, देवराव नारायण बंडेवार, इरशाद खान, असरार अहमद सिद्दीकी, रिजवान अंसारी, बिलकीश बानो, जन्नत खातुल शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
दिव्यांग बांधवांच्या सन्मानातून ‘समाजाची खरी ताकद एकजुटीत आहे’ हा संदेश दिला गेला. प्रहार जनशक्ती पक्षाच्या या उपक्रमामुळे गावात सामाजिक ऐक्य, संवेदना आणि सकारात्मकतेचा नवा आदर्श निर्माण झाला आहे. अशा उपक्रमांनी दिव्यांग बांधवांना आधार, प्रोत्साहन आणि समाजातील पुढील वाटचालीस नवी दिशा मिळते.










