पोलीस स्टेशन भद्रावती अपराध क्रमांक ६०३/२०२५ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता-२०२५ मधील फिर्यादी शंकर कवाडे रा. वडाळा तुकूम ता. भद्रावती यांनी दिनांक ०४/११/२०२५ रोजी रिपोर्ट दिला की, त्यांची मोटार सायकल हिरो सीडी डिलक्स किं.अं. २०,०००/- रु. ची गुलमोहर पार्क गेट नं. २ संताजी नगर भद्रावती येथुन चोरीस गेलेली आहे. यावरुन सदरचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.
पोलीस स्टेशन भद्रावती येथील गुन्हे शोध पथकाने सदर चोरीची मोटार सायकल व चोराचा शोध घेत तपास करीत असतांना त्यांनी गोपनिय बातमीदारांकडुन मिळालेल्या माहितीचे आधारे दि. ४/१२/२०२५ रोजी आरोपी नामे विकास ऋषी बावणे रा. गुरुनगर भद्रावती यास अटक करुन त्याचे ताब्यातुन गुन्हयातील चोरीस गेलेली मोटार सायकल हिरो सीडी डिलक्स किं.अं.२०,०००/- रु. ची जप्त करण्यात आली असुन पुढील तपास सुरु आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा संतोष बाकल यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांचे नेतृत्वात पोउपनि गजानन तुपकर, महेंद्र बेसरकर, पोअं जगदीश झाडे, अनुप आस्टुनकर, विश्वनाथ चौधरी, गोपाल आतकुलवार, योगेश घाटोळे, रोहीत चिटगिरे, खुशाल कावळे, संतोष राठोड यांनी केली आहे.