Home Breaking News अवैरीत्या सुगंधीत प्रतीबंधीत तंबाकु बाबत पोलीसची रेड कार्यवाही

अवैरीत्या सुगंधीत प्रतीबंधीत तंबाकु बाबत पोलीसची रेड कार्यवाही

45

अवैरीत्या सुगंधीत प्रतीबंधीत तंबाकु बाबत पोलीसची रेड कार्यवाही

वरोरा :
दि. 03/12/2025 रोजी वरोरा पोलीसांनी मिळालेल्या गोपनीय माहीतीच्या आधारे मौजा एकअर्जुना वरोरा येथे आरोपी नामे मिथुन लहानु घोटेकर वय 42 वर्ष रा.पंचशील चैक, जटपुरा गेट चंद्रपुर, याचे पिकप वाहनामध्ये व त्याने पाहीजे आरोपी अनील बोधे रा. वरोरा याचे रुम मध्ये साठवुन ठेवलेल्या सुगंधीत प्रतीबंधीत तंबाकु बाबत रेड कार्यवाही बाबत करुन खालील प्रमाणे नमुद आरोपी कडुन मुद्देमाल जप्त केला आहे.
1. सुगंधित प्रतीबंधित तंबाकु एकुन किमत 12,40,260/-रू मुद्देमाल
2. अवैध्दरित्या वाहतुक करण्याकरीता वापरलेली एक जुनी वापरती अशोक लेलॅन्ड कंपनीचा मालवाहु क्र. एम एच 34 बिजी 1009 कि. अं. 5,00,000/- रू असा एकून 17,40,260/- रू चा माल विनापरवाना अवैद्यरीत्या मिळुन आले असता सदर चा मुद्देमाल जप्त करुन ताब्यात घेण्यात आला व मिळुन आलेल्या नमुद आरोपी विरुद्ध पो.स्टे. वरोरा अप क्र. 827/2025 कलम 123,223,274,275 भा.न्या.सं. 2023 सहकलम 59 अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
दि.04/12/2025 रोजी वरोरा पोलीसांनी तसेच अन्न सुरक्षा अधिकारी व कर्मचारी असे सयुक्त मोहीम राबवुन मिळालेल्या गोपनीय माहीतीच्या आधारे मौजा वरोरा शहरात आरोपी नामे अनिल फुलचंद शर्मा राह. राम मंदिर वार्ड वरोरा याने वरोरा शहरात ठीक-ठीकानी साठवुन ठेवलेल्या सुगंधीत प्रतीबंधीत तंबाकु बाबत रेड कार्यवाही करुन खालील प्रमाणे नमुद आरोपी कडुन मुद्देमाल जप्त केला आहे.
1. सुगंधीत प्रतीबंधक तंबाकु व पान मसाला एकुन किमत 6,49,170/- रु चा माल बिनापरवाना अवैद्यरीत्या मिळुन आले असता सदर चा मुद्देमाल जप्त करुन ताब्यात घेण्यात आला व मिळुन आलेल्या नमुद आरोपी विरुद्ध पो. स्टे. वरोरा अप क्र 829/2025 कलम 123,223,274,275 भा.न्या.सं. 2023 सहकलम 26(1), 26(2) (iv)27(3)(e), 30(2)(a)59 अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. या प्रमाणे पो. स्टे. वरोरा येथे सुगंधित प्रतीबंधीत तंबाकु याबाबत दोन कार्यवाही करण्यात आल्या आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक सा., अप्पर पोलीस अधिक्षक सा. तसेच मा. उप. विभागीय पोलीस अधिकारी श्री. संतोष बाकल सा. वरोरा, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे सा., सपोनी सुनील पाटील सा. पोलीस अंमलदार दिलीप सुर, महेश गावतुरे, मनोज ठाकरे, सौरभकुलते, प्रशांत नागोसे किशोर बोडे, अमोल नवघरे, सुखराज यादव, विशाल राजुरकर, संदिप मुळे पोलीस स्टेशन वरोरा यांनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here