स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर अवैधरित्या गौण खनिज ची वाहतुक करणाऱ्या तिघांविरुध्द कारवाई
तीन ट्रॅक्टर व रेतीसह एकुण १५,१५,०००/- रु. चा माल जप्त
दिनांक ०४ डिसेंबर, २०२५ रोजी मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पथक पोलीस स्टेशन राजुरा हद्दीत सापळा रचुन अवैधरित्या गौण खनिज (रेती) ची उपसा करुन चोरटी वाहतुक करीता असलेल्या तीन ट्रॅक्टर ट्रॉलीसह पकडुन रेती वाहतुक करणाऱ्या आरोपी नामे (१) राजेश्वर श्रीधर मालेकर (२) शुभम नामदेव मुसळे (३) सचिन भिमराव मडावी तिन्ही रा. आर्वी ता. युरा यांना ताब्यात घेवुन त्यांचेविरुध्द पोलीस स्टेशन राजुरा येथे अपराध क्रमांक ५९८/२०२५ कलम ३०३(२), ३ (५) भारतीय न्याय संहिता-२०२३ सहकलम ४८ (७), ४८(८) म.ज.म.स. सहकलम १७७ मो.वा.का. अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असुन आरोपीतांचे ताब्यातील अवैध गौण खनिज (रेती) ची चोरटी वाहतुक करण्याकरीता वापरलेले तीन ट्रॅक्टर ट्रॉलीसह किं. अं. १५,००,०००/- रु. आणि तिन्ही ट्रॅक्टर मधील एकुण ३ ब्रास गौण खनिज (रेती) किं. १५,०००/- रु. असा एकुण १५,१५,०००/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला असुन गुन्हयाचा तपास राजुरा पोलीस करीत आहे.
सदरची कारवाई मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर, ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांचे नेतृत्वात सपोनि दिपक कॉक्रेडवार, सफौ स्वामीदास चालेकर, पोहवा अजय बागेसर, पोअं. गोपीनाथ नरोटे यांनी केली आहे.