Home Breaking News घुग्घुस वणी महामार्गच्या बाजुला वाणी परीक्षेञात कुंभारी शिव नायगांव झुडुपात मृत अवस्थेत...

घुग्घुस वणी महामार्गच्या बाजुला वाणी परीक्षेञात कुंभारी शिव नायगांव झुडुपात मृत अवस्थेत वाघ सापडला

66

घुग्घुस वणी महामार्गच्या बाजुला वाणी परीक्षेञात कुंभारी शिव नायगांव झुडुपात मृत अवस्थेत वाघ सापडला

घुग्घुस :
आज दिनांक २०/१२/२०२५ रोजी सकाळी अंदाजे ८.४५ च्या सुमारास पांढरकवडा वनविभागाअंतर्गत वणी वनपरिक्षेत्रातील वणी वर्तुळ मधील वणी नियतक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या मौ जा कुंभारी शिव नायगांव (बु.) ता. वणी जिल्हा यवतमाळ येथे वन्यप्राणी वाघ वणी ते घुगुस जाणाऱ्या रोड च्या उजव्या बाजुला मृत अवस्थेत पडुन असल्याची माहिती निलजई येथिल पोलीस पाटील यांनी भ्रमणध्वनी वरुन दिली. त्यानुसार सदर माहितीची पडताळणी करणेकरिता क्षेत्र सहाय्यक वणी व वनरक्षक शिरपुर बिट यांनी घटनास्थळी जावुन घटनेची पाहणी करण्याच्या सुचना दिल्या. सदर कर्मचारी यांनी घटनास्थळी वाघ मृत अवस्थेत पडून असल्याची माहिती दिली. सदरची माहिती मा. सहायक वनसंरक्षक (जंकास व कॅम्पा) वणी यांना देवून त्यांच्या समवेत घटनास्थळी जावुन पाहणी केली. मा. सहायक वनसंरक्षक (जंकास व कॅम्पा) वणी यांनी सदर घटनेची माहिती वरीष्ठ वनअधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर सदर घटणेचा वनगुन्हा नोंद करण्यात आला. घटनास्थळी मा. श्री. डॉ. किशोर मानकर, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) यवतमाळ, मा. श्री. यशवंत बहाळे, उपवनसंरक्षक पांढरकवडा वनविभाग पांढरकवडा, मा. श्री. विशाल चव्हाण, सहायक वनसंरक्षक (वन्यजीव) पांढरकवडा, मा. सौ. वंदना धांडे, वनपरिक्षेत्र अधिकारी (रो.ह.यो.) वणी, मा. श्री. रमजान विराणी मानद व वन्यजीव रक्षक तसेच मा. श्री. मनवार, सहायक पोलीस निरीक्षक शिरपुर व मा. श्री. बावणे, पशुधन विकास अधिकारी व चमू तसेच मा. ज्युरी मॅडम प्रतिनीधी WII यांनी घटनास्थळी येवून घटनेची पाहणी केली. सदर अधिकाऱ्यांसमोर मृत वाघाचे शरीर पुढील तपासणी व शवविच्छेदन करणे करिता ताब्यात घेण्यात आले व सदर अधिकाऱ्यांसमक्ष शवविच्छेदन करुन NTCA च्या मार्गदर्शन सुचनेनुसार सर्वासमक्ष दहन करण्यात आले. पुढील तपास मा. मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) यवतमाळ व मा. उपवनसंरक्षक पांढरकवडा वनविभाग पांढरकवडा यांचे मार्गदर्शनाखाली मा. सहायक वनसंरक्षक (जंकास व कॅम्पा) वणी व वनपरिक्षेत्र कु. सुजाता सुर्यकांत विरकर अधिकारी (प्रादे.) वणी करित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here