Home Breaking News आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे राजमाता जिजाऊ यांना अभिवादन

आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे राजमाता जिजाऊ यांना अभिवादन

19

आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे राजमाता जिजाऊ यांना अभिवादन



जिजाऊंच्या पराक्रमाची गाथा घराघरात वाजली जावी: किरण बोढे


घुग्घुस: येथील आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे सोमवार, १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ माँसाहेब भोसले यांच्या तारखेप्रमाणे जयंतीनिमित्त आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त नगर सेवक विवेक बोढे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.

मनोगत व्यक्त करतांना प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे म्हणाल्या, स्वामी विवेकानंद यांची आज जयंती. हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पराक्रमी योद्धा जिजामातेने घडविला, शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीची प्रेरणा देऊन स्वराज्याची स्थापना केली. जिजाऊंच्या विचारांची प्रेरणा प्रत्येक आईला मिळावी, जिजाऊंच्या पराक्रमाची गाथा घराघरात वाजली जावी. महान स्वराज्य संकल्पिका, स्वराज्य प्रेरीका राजमाता जिजाऊंना मानाचा मुजरा.

यावेळी नगर सेविका चैताली सातपुते, भाजपाचे बबलू सातपुते, निशा उरकुडे, प्रीती धोटे, अजय लेंडे, हनुमान खडसे, खुशबू मेश्राम, भारती परते, प्रिया नागभीडकर, नेहा कुम्मरवार, जाई आत्राम, मयुरी धुर्वे, मानसी परदेशी, अंजली झाडे, आरती चटकी, प्रणाली मशीरकर,गीता गाडगे, वैभव गेडाम, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here