Home Breaking News आई फोउंडेशनच्या वतीने घुग्घुस येथे जिजाऊंच्या गर्जनेचा वारसा आणि विवेकानंदांच्या विचारांचा स्फोटक...

आई फोउंडेशनच्या वतीने घुग्घुस येथे जिजाऊंच्या गर्जनेचा वारसा आणि विवेकानंदांच्या विचारांचा स्फोटक हुंकार!

34

आई फोउंडेशनच्या वतीने घुग्घुस येथे जिजाऊंच्या गर्जनेचा वारसा आणि विवेकानंदांच्या विचारांचा स्फोटक हुंकार!



घुग्घुस येथे आज सोमवार दि. १२/०१/२०२६ रोजी स्वराज्य जननी राजमाता माँ साहेब जिजाऊ आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त झालेला कार्यक्रम म्हणजे सत्तेच्या सुखासीनतेला थेट आव्हान देणारा आणि समाजाला जागं करणारा रणशिंगाचा नाद होता. नवनिर्वाचित नगर अध्यक्षा, उपाध्यक्ष तसेच आई फाउंडेशनच्या अध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गावातील मुख्य चौक छत्रपती श्री. शिवाजी महाराज चौकात हा जयंती उत्सव साजरा करण्यात आला जिजाऊ माँ साहेब, स्वामी विवेकानंद आणि छत्रपती शिवाजी श्री .महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून अन्यायाविरुद्ध लढ्याची शपथ घेण्यात आली.

राजमाता जिजाऊ म्हणजे मूक मातृत्व नव्हे, तर अन्यायाला चिरडणाऱ्या संस्कारांची ज्वालामुखी! त्यांनी शिवरायांच्या मनात तलवारीपेक्षा धारदार विचार दिले. आज जे सत्ताधारी गप्प बसतात, जे अन्याय पाहूनही डोळेझाक करतात, त्यांच्यासाठी जिजाऊंचे विचार हा आरसा आहे—जो सत्य दाखवतो आणि भ्याडपणा उघडा पाडतो.

स्वामी विवेकानंदांनी देशाला सांगितले, “दुर्बलता हे पाप आहे.” तरीही आजचा तरुण बेरोजगारी, अन्याय आणि शोषणाखाली गुदमरतो आहे. विवेकानंदांचे विचार फक्त फोटोपुरते मर्यादित ठेवणाऱ्यांना हा कार्यक्रम थेट इशारा होता—फक्त माळा घालून राष्ट्र उभं राहत नाही, तर संघर्षातूनच राष्ट्र घडतं!
या कार्यक्रमात संस्थेच्या वतीने नवनिर्वाचित नगर अध्यक्षा यांच्यासह नगरसेवक व नगरसेविकांचा सन्मान करण्यात आला.

घुग्घुस नगर परिषद उपाध्यक्ष मा. राजुभाऊ रेड्डी व रोशनजी परशुराम पचारे यांनी पत्रकारांशी बोलताना आई फाउंडेशनच्या लढाऊ, निर्भीड आणि जनतेच्या बाजूने उभ्या असलेल्या कार्याची ठाम भूमिका मांडली.

आई फाउंडेशनचे पदाधिकारी, नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी आणि गावातील जागरूक नागरिकांनी एकच सूर लावला—जोपर्यंत समाजात अन्याय आहे, तोपर्यंत जिजाऊंचे विचार आणि विवेकानंदांचा हुंकार थांबणार नाही! हा कार्यक्रम म्हणजे इतिहासाची पूजा नव्हे, तर वर्तमानाला धडा देणारा आणि भविष्याला इशारा देणारा सामाजिक एल्गार ठरला कार्यक्रमांची सांगता घोश वाक्यांनी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here