राजमाता जिजाऊ सावित्रीबाई व रमाईच्या स्मृतीना वंदन करत महिलांचा सन्मान
नितेश केराम
चंद्रपूर परंपरा आणि परिवर्तन यांचा संगम घडवत स्त्रीशक्तीचा सन्मान हा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता सामाजिक जागृतीचे व्यासपीठ ठरू शकतो याचे प्रत्यतर आईसाहेब बहुउद्ये शीय सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून आलेल्या उपक्रमात पाहायला मिळाले ( दि 22) रोजी आयोजित हळदी कुंकू समारंभाने केवळ संस्कृतीक परंपरेचे पालन करता स्त्रीच्या अस्मिता स्वाभिमान आणि समाजघडणीतल्या तिच्या निर्णायक भूमिकेचा ठाम उपचार केला
राजमाता जिजाउंचे शौर्यसंस्कार माता सावित्रीबाई फुले यांची शिक्षणक्रांती आणि माता रमाई यांचे सामाजिक समतेसाठीचे संघषमय योगदान या तीन प्रेरणास्थानांचा उल्लेख कार्यक्रमात वारंवार अधोरेखित झाला या एतीहासिक स्त्रीपुरुषाच्या परंपरेचा धागा आजच्या महिलांपर्यंत पोहोचवण्याचा पर्यंत आयोजकांनी केला आहे