Home Breaking News कोरपना येथे युवा प्रतिष्ठान व विजयराव बावणे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित हळदी...

कोरपना येथे युवा प्रतिष्ठान व विजयराव बावणे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित हळदी कुंकू स्नेह सम्मेलन कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

38

कोरपना येथे युवा प्रतिष्ठान व विजयराव बावणे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित हळदी कुंकू स्नेह सम्मेलन कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद



नितेश केराम
2000 हुन अधिक महिलांची लक्षणीय उपस्थिती
युवा प्रतिष्ठान कोरपना व विजयराव बावणे मित्र परिवार कोरपना यांच्या संयुक्त विद्यमाने खास महिला भगिनींसाठी आयोजित हळदी कुंकू व स्नेहसंमेलन कार्यक्रम कोरपना येतील श्रीकृष्ण मंगल कार्यलयात मोट्या उत्साहात आनंदी वातावर णात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला या कार्यक्रमाला जवळपास 2000 हुन अधिक महिलांची विक्रमी उपस्थिती लाभली असून सम्पूर्ण सभागृह महिलांनीं फुलून गेले होते कार्यक्र मस्थळी महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला कार्यक्रमाचे अध्यक्षपद माजी आमदार सुदर्शनजी निमकर राजुरा यांनी भूषविले तर कार्यक्रमाचे उदघाटन रवींद्र शिंदे अध्यक्ष सीडीडीसी बँक चंद्रपूर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मान्यवरांनी महिलांच्या सामाजिक संस्कृतीक व कोंटुबिक भूमिकेवर मार्गदर्शन करत अशा स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे महत्व अधोरेखित केले
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लता वाढवी ठानेदार विजयराव बावणे संचालक सीडीडीसी बँक चंद्रपूर कुंदाताई जणेकर जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी चंद्रपूर संद्या चांदेकर नगरसेविका ,अशोकराव बावणे  सभापती ,कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपना , शाम भाऊ रणदिवे , माजी सभापती पंचायत समिती कोरपना, पुंडलिक गिरसावले नंदाताई बावणे,  नगराध्यक्ष कोरपना ,इस्माई शेख  उपनगराध्यक्ष कोरपना ,यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here