2 मोटार पंप व केबल असा एकुण किं. ६९,०००/- रु. चा माल जप्त
दिनांक २३/०१/२०२६ रोजी फिर्यादी श्री रितीक संजय थेरे रा. एकार्जुना यांनी पोस्टे वरोरा येथे तक्रार नोंदविली की, त्यांचे शेतातील व शेजारील शेतकरी यांचे शेतातील दोन नग मोटार पंप व केबल असा एकुण ६९,०००/- रु. चा माल कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरुन नेला यावरुन पोस्टे वरोरा येथे चोरीचा गुन्हा नोंदविण्यात येवुन पोस्टे चे गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गोपनिय बातमीदार नेमुन सीसीटीव्ही फुटेज पाहणी करुन तंत्रबध्द पध्दतीने सखोल तपास केला असता यातील आरोपी नामे (१) सिताराम आसाराम भिसे (२) सुनिल रामप्रसाद साळुंखे दोन्ही रा. गोकुलनगर वणी जि. यवतमाळ यांना अटक करुन त्यांचे कडुन गुन्हयातील चोरीस गेलेला संपुर्ण माल हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी श्री मुम्मका सुदर्शन-पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे- अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री संतोष बाकल, उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री अजिंक्य तांबडे यांचे नेतृत्वात सपोनि श्री शरद भस्मे, पोहवा /२२४४ दिलीप सुर, पोहवा / २५७१ संदीप मुळे, पोअं/२६४३ महेश गावतुरे, पोअं/१०५३ सौरभ कुलथे यांनी केली आहे.