Home Breaking News महिला महोत्सव म्हणजे मातृशक्तीच्या प्रतिभा आणि ऊर्जेचा संगम – आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार.

महिला महोत्सव म्हणजे मातृशक्तीच्या प्रतिभा आणि ऊर्जेचा संगम – आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार.

20

महिला महोत्सव म्हणजे मातृशक्तीच्या प्रतिभा आणि ऊर्जेचा संगम – आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार.



घुग्घुस शहरात भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे दिमाखदार आयोजन.


घुग्घुस, दि. २२
गुढीपाढवा व नववर्षाच्या सुरवातीला स्थानिक बांगडे ले-आऊट येथे प्रयास सखी मंच व भाजपा महिला मोर्चा यांच्या वतीने आयोजित केलेल्या मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार क्रीडा व सांस्कृतिक महिला महोत्सवाने संपूर्ण परिसर महिलांच्या ऊर्जेने आणि उत्साहाने न्हाऊन निघाला.

क्रीडा आणि संस्कृतीचा अनोखा संगम साधणाऱ्या या दिमाखदार महोत्सवाचे उद्घाटन आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सुप्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्री प्रार्थना बेहरे यांची प्रमुख उपस्थिती महिलांसाठी विशेष आकर्षण ठरली.

कार्यक्रमाला संबोधित करताना आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार म्हणाले की, हा केवळ एक उत्सव नसून मातृशक्तीच्या प्रतिभा आणि ऊर्जेचा संगम आहे. जो मन जिंकतो, तो जगही जिंकतो आणि आज या मंचाने उपस्थित हजारो महिलांची मने जिंकली आहेत. चंद्रपूर जिल्ह्याच्या वैभवशाली इतिहासाचा अभिमानाने उल्लेख करत ते पुढे म्हणाले की, सर्वाधिक वाघ, आनंदवनाचा सेवाभाव, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आणि औद्योगिक सामर्थ्य यामुळे चंद्रपूर जिल्हा खऱ्या अर्थाने ‘चॅम्पियन’ आहे. स्थानिक कलाकारांमध्ये अपार क्षमता असून, या व्यासपीठामुळे भविष्यात मोठे कलाकार घडतील, असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला.
याचवेळी मुनगंटीवार यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी माता महाकालीकडे प्रार्थना ही केली.

या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मराठी सिनेअभिनेत्री प्रार्थना बेहरे यांची उपस्थिती आकर्षणाचे केंद्र ठरली.
याप्रसंगी आ. मुनगंटीवार यांच्या कार्याचा गौरव करताना प्रार्थना बेहरे म्हणाल्या की, आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार हे अविरत सेवेचे व्रत घेऊन काम करणारे लोकनेते आहेत आणि त्यांचा जनसेवेचा आलेख आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

कार्यक्रमाचे आयोजक तथा आमदार श्री. देवराव भोंगळे यांनी महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला. महिलांमध्ये स्वतःची क्षमता ओळखण्याची आणि ती वापरण्याची मोठी ताकद असते, त्यांनी स्वतःला ओळखून सिद्ध करावे, हाच या महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

या भव्य आयोजनासाठी भाजपचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, प्रयास सखी मंचच्या मार्गदर्शिका अर्चना भोंगळे, अध्यक्षा किरण बोढे यांच्यासह सर्व सदस्यांच्या नियोजनाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.
या महोत्सवाला अमोल थेरे, विनोद चौधरी,नगरसेविका वैशाली ढवस, चैताली सातपुते, निरीक्षण तांड्रा, बबलू सातपुते, नितु चौधरी, सिनू इसारप, गणेश कुटेमाटे यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि परीसरातील हजारो महिला भगिनींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here