Home Breaking News चंद्रपूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली नव्या जिल्हाधिकारी...

चंद्रपूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली नव्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांची भेट

88

चंद्रपूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली नव्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांची भेट



चंद्रपूर  : जिल्ह्याच्या नवनियुक्त जिल्हाधिकारी माननीया वसुमना पंत यांनी नुकताच कार्यभार सांभाळल्यानंतर आज दि.८एप्रील ला चंद्रपूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एका शिष्टमंडळाने तडफदार अध्यक्षा सौ. बेबीताई उईके यांच्या कुशल नेतृत्वाखाली नवनियुक्त जिल्हाधिकारी महोदयांची स्नेह भेट घेऊन चंद्रपूरकरांच्या समस्यांबाबत व इतर काही महत्त्वाची विषयांवर चर्चा केली . जिल्हाधिकारी महोदयांनी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव सहकार्य करण्याचे आश्वासन चंद्रपूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळाला दिले. या शिष्टमंडळात पक्षाचे जेष्ठ नेते प्रदेश सरचिटणीस हिराचंदजी बोरकुटे, ओबीसी आघाडी अध्यक्ष विठ्ठल मस्की सर, कामगार आघाडी अध्यक्ष महेश काहीलकर, शहर राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष दीपक कटकोजवार, शहर सरचिटणीस मनिष मोडक, शहर सचिव सौ. शोभाताई घरडे, विजय मालीकर,अमित बेले, आदी पदाधिका-यांचा प्रामुख्याने समावेश होता‌.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here