Home Breaking News *सोनापुर येथील वनजमिनीवर दिर्घकाळापासुन शेती करणारया भुमीहिन शेतकरयांच्या समस्या सोडविण्यासाठी भाकपचा एल्गार*

*सोनापुर येथील वनजमिनीवर दिर्घकाळापासुन शेती करणारया भुमीहिन शेतकरयांच्या समस्या सोडविण्यासाठी भाकपचा एल्गार*

171

*सोनापुर येथील वनजमिनीवर दिर्घकाळापासुन शेती करणारया भुमीहिन शेतकरयांच्या समस्या सोडविण्यासाठी भाकपचा एल्गार*



वणी*— भारतीय कम्युनिस्ट पक्ष, वणी तालुका कौंसिलच्या वतीने मौजा सोनापूर येथील वनजमिनीवर गेल्या ३० वर्षांपासून उपजीविका करणाऱ्या भूमिहीन शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाकपचे नेते कॉ.अनिल हेपट,कॉ.अनिल घाटे,कॉ मोरेश्वर कुंटलवार यांचे नेत्रुत्वात प्रचंड मोर्चा काढुन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात भाकपने म्हटले कि या शेतकऱ्यांनी अनेक वर्षांपासून या जमिनीवर शेती करून आपला उदरनिर्वाह चालवला असून, त्यांच्याकडे अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. अशा परिस्थितीत त्यांना जमिनीवरून हटवण्याचा प्रयत्न होत असल्याने त्यांच्या जगण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

या शेतकऱ्यांनी स्वतःच्या कष्टाने पडीत व उजाड जमिनीला शेतीयोग्य बनवले असून, त्यांच्या शेतीमुळेच परिसरात उत्पादन वाढले आहे. दुसरीकडे, वनविभागाकडून या जमिनीवर वृक्षलागवडीचे प्रयत्न करूनही अपेक्षित यश मिळाले नसल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे अनेक वर्षे कष्ट करून उपजीविका उभी केलेल्या शेतकऱ्यांना बेदखल करणे अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत विस्थापित करू नये व त्यांना सुरक्षितपणे शेती करण्याचा व जगण्याचा हक्क कायम ठेवावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

सदर वेळी गंगाधर गायकवाड, भारत केमेकर, राजू देऊळकर, सुभाष केमेकर, संदीप बावणे, राजेंद्र चिडे, लक्ष्मण दाते, आनंदराव शेंद्रे, अशोक जीवतोडे, विलास जीवतोडे, सुखदेव येरेकार, गुलाब मांडवकर, शंकर वाढई, महादेव ढोके यांचेसह शेकडो शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here