चंद्रपूर मध्ये भाजपा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष ड्रा देवराव होळी यांच्या आदिवासी जनसंवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
जिल्हास्तरीय बैठकीत संघटन मजबुतीचा निर्धार
नितेश केराम
चंद्रपूर येते भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार ड्रा देवराव होळी यांच्या आदिवासी जनसंवाद यात्रेनिमित्त भाजपा आदिवासी मोर्चाची जिल्हास्तरीय बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संम्पण झाली या बैठकीस आदिवासी विकास मंत्री अशोक उइके तसेच भाजपा आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्ष अरुण मडावी नागपूर महानगर आदिवासी मोर्चाचे अध्यक्ष आकाश मडावी चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक जिथेश कुळमेथे माजी महानगर जिल्हाध्यक्ष धनराज कोवे अल्का आत्राम जिल्हा महामंत्री प्रमोदजी कोडापे विलास कोराम अशोक आलम अभय मडावी ज्योती वळके अरविंद मडावी किशोर आत्राम हे प्रमुख उपस्थित होते बैठकीस जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोट्या संखेने समाजबांधव उपस्थित होते माजी आमदार ड्रा देवराव होळी यांची भाजपा आदिवासी मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात प्रथमच आगमन झाल्याने त्यांचे भव्य आणि जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले बैठकीत मार्गदर्शन करताना माजी आमदार ड्रा देवराव होळी यांनी पक्ष संघटन अधीक मजबूत करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्याने गावपातळीपर्यंत पोहचण्याचे आवाहन केले आदिवासी समाजाला भारतीय जनता पक्षाच्या विचारसणीशी जोडून त्याच्या समस्या जाणून घेणे शासकीय योजनांचा लांभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविने तसेच समाजातील युवक महिला आणि शेतकरी वर्गाला संघटनात सहभागी करून घेण्यावर त्यांनी भर दिला
यावेळी त्यांनी आदिवासी समाजाला एकजूट करण्यासाठी भाजपा आदिवासी मोर्चा तर्फे एक पंचसुत्री कार्यक्रम तयार करण्यात आल्याची माहिती दिली या पंचसूत्री कार्यक्रमध्ये कुटुंब प्रबोधन पर्यावरण संवर्धन सामाजिक स्वजागृती या विषयांवर प्रभावीपणे काम करणे अंत्यन्त गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले समाजातील प्रत्येक घटकाणे या पाच सूत्राचा स्वीकार केल्यास आदिवासी समाज अधिक संघटित सक्षम आणि एकसंघ राहील असे त्यांनी स्पष्ट केले