Home Breaking News जिवती तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ प्रशासन झोपेत

जिवती तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ प्रशासन झोपेत

148

जिवती तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ प्रशासन झोपेत



सहा महिन्यांचे थकीत वेतन त्वरित द्या अन्यथा तीव्र आंदोलन सुबोध चिकटे यांचा इशारा


नितेश केराम

जिवती तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मागील सहा महीन्यांपासून वेतन थकीत असल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर अक्षरश उपासमारीची वेळ आली आहे शासनाच्या निष्क्रिय आणि उदासीन धोरणामुळे कर्मचाऱ्यांचे जीवमान पूर्णपणे कोलमडले असून हा प्रकार अत्यन्त संताजनक आहे या गँभीर प्रश्ननाची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते सुबोध चिकटे यांनी आज जिवती तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन सादर केले या निवेदनाद्रारे सहा महीन्यांपासून थकीत असलेले वेतन तात्काळ कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे सुबोध चिकटे यांनी प्रशासनावर जोरदार टीका करत मटले की ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवकाचा दुवा म्हूणन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे शासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे जे कर्मचारी गावपातळीवर काम करतात गावातील घर पावती पाणी सोडणे गावातील विधुत संदर्भात काम करतात त्यांनाच वेतनासाठी भटकंती करावी लागत आहे हि अंत्यत लाजिरवाणी बाब आहे तसेच त्यांनी इशारा दिला की जर त्वरित वेतन जमा करण्यात आले नाही तर येत्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची सम्पूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील जिवती तालुक्यातील कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप असून प्रशासनाने वेळ न दवडता तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे अन्यता हा निर्णय आणखी गँभीर होणार आहे असा इशारा ग्रामपंचायत कर्मचारी यांनी दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here