Home Breaking News घुग्घूस शहर काँग्रेस स्मार्ट मिटर विरोधात आक्रमक

घुग्घूस शहर काँग्रेस स्मार्ट मिटर विरोधात आक्रमक

49

घुग्घूस शहर काँग्रेस स्मार्ट मिटर विरोधात आक्रमक



महावितरण अभियंताला निवेदन देत दर्शवीला विरोध


घुग्घूस :- शहरातील नागरिकांना महावितरण कार्यालयाच्या वतीने प्रिय उपभोक्ता भारत सरकारने दि.17 – 08 – 2021 21 रोजी जारी केलेल्या राजपत्र अधिसूचनेनुसार जर तुमचा मीटर स्मार्ट मीटर नसेल तर हा संदेश मिळाल्यापासून 48 तासानंतर MSEDCL (महावितरण )किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधी द्वारे तुमचे सध्याचे मीटर बदलवून त्याऐवजी नवीन स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे असा मेसेज ग्राहकांना पाठवण्यात आलेला आहे एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सांगत आहे की महाराष्ट्रात बळजबरीने व फसवणुकीने स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाही.

मात्र दुसरीकडे महावितरण कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी ग्राहकांना स्मार्ट मीटर लावण्या संदर्भात जोर देत आहे ज्या ग्राहकांचे सध्याचे मीटर बंद झाले असेल किंवा दुरुस्त झाले असेल त्यांना स्मार्ट मीटरच लावण्याची सक्ती करण्यात येत आहे या प्रकाराच्या निषेधार्थ व विरोधात घुग्घूस शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगर परिषदेचे उपाध्यक्ष राजू रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे मुख्य अभियंता भटारकर यांना निवेदन देण्यात आले व त्यांना नागरिकांच्या घरात त्यांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर लावण्यात येऊ नये अशा सूचना करण्यात आले नागरिकांच्या घरात जर बळजबरीने स्मार्ट मीटर लावण्यात आले तर शहर काँग्रेसतर्फे याविरोधात मोठ्या स्वरूपाचा आंदोलन उभारण्याचाही इशारा देण्यात आला

याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, नगरसेवक दिलीप पिट्टलवार,नगरसेविका आशाताई पानघाटे, विशाल मादर, गणेश पानघाटे निखिल पुनगंटी, शहंशाह शेख व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here