निराधार लाभार्थ्याचे तीन ते चार महिन्या पासूनचे वेतन थकीत प्रशासन झोपेत
नितेश केराम
कोरपना / कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव येतील बऱ्याच लाभार्थ्याचे तीन ते चार महिन्या पासूनचे वेतन थकीत असल्यामुळे लाभार्थ्यांना मोट्या कसरतीचा सामना करावा लागत आहे तीन ते चार महिने होऊनहीं निराधार लाभार्थी आपल्या वेतनाच्या चिंतेत आहे या सरकार जवळ लाडकी बहीण योजनेसाठी पैसे आहे परंतु निराधार लाभार्थी यांना देण्यासाठी पैसे नाही असे हें निर्लज्ज सरकार आहे असंच जर राहीलतर निराधार लाभार्थ्याचं जगणं कठीण होऊ शकते आज जवळपास किती तरी लाभार्थी या योजने पासन वंचीत आहे आणि कितेकांचे पैसे साईट प्रॉब्लेम असल्यामुळे अडकन्यात आले आहे तहसील कार्यालय मध्ये जाऊन विचार पूस केली असता तर कार्यालय मधले प्रतिनिधी सांगतात वरून साईट प्रॉब्लेम आहे तर अशा निराधार लाभार्थ्यांनी काय करावे आणि याचा कुणाला जॉब विचारावा असा प्रश्न यांच्या मनात निर्माण झाला असून या प्रशासनाने याच्या कडे लक्ष केंद्रित करुन यांचे तीन ते चार महिन्याचे थकीत वेतन तात्काळ त्यांच्या बँक खात्यात जमा करावे अशी मागणी निराधार लाभार्थी करत आहे