Home Breaking News तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आशिष नारायण हिवरकर सलग चौथ्या वर्षी प्रथम

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आशिष नारायण हिवरकर सलग चौथ्या वर्षी प्रथम

90

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आशिष नारायण हिवरकर सलग चौथ्या वर्षी प्रथम



नितेश केराम
कोरपना / पंचायत समिती कोरपना आणि जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 54 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन एकलव्य इंग्लिश मिडीयम स्कुल बेबी येथे 24 ते 26 ऑक्टॉबर या कालावधीत आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कल्याणजी जोगदंड शिक्षण विस्तार अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्रशांत धाबेकर जिल्हाध्यक्ष विज्ञान अध्यक्ष मंडप चंद्रपूर श्री आशिषजी देरकर संस्था सचिव श्री मुसळे सर केंद्रप्रमुख श्री शेंडे सर प्राचार्य श्री टोंगे सर शाळा प्रमुख आदी मान्यवर उपस्थिती होते या प्रदर्शनात स्व संगीता चटप उच्च माध्यमिक आश्रमशाळा कोरपना येतील इयत्ता 12 वी विज्ञान शाखेचा विध्यार्थी आशिष नारायण हिवरकर याने घवघवीत यश संपादन करीत तालुक्यात चौथांदा प्रथम क्रमांक पटकावला या प्रदर्शनात आशिष नारायण हिवरकर याने आपली नाविन्यपूर्ण वैज्ञानिक प्रतिक्तृती सादर केली त्याच्या या प्रकल्पाला परीक्षकांकडून विशेष दाद मिळाली आशिषने उच्च माध्यमिक आदिवासी विभागातून तालुक्यात प्रथम क्रमांक सलग चौथांदा पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला मान्यवरांच्या हस्ते आशिष नारायण हिवरकर याला शिल्ड प्रमाणपत्र पुष्पगुछ देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाला मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या यशाबदल मुख्याध्यापक खडसे सर श्री वैभव कवते सर श्री अनुप रणदिवे सर सौ ज्योतीताई मॅडम सौ वनकर मॅडम श्री गावंडे सर शिक्षक वर्ग तसेच कर्मचारी वर्ग वडील श्री नारायण हिवरकर आदींनी अभिनंदन केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here