Home चंद्रपूर घुग्घुस येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

घुग्घुस येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

106

घुग्घुस :  शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवार, ३ मार्च रोजी सकाळी ८ वाजतापासून राबविण्यात आली.

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम-२०२४ अंतर्गत दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी हे ब्रीदवाक्य घेऊन ५ वर्षा खालील प्रत्येक बालकाला पोलिओचा डोस देण्यासाठी ही मोहीम शहरात राबविण्यात आली.

प्रा. आ. केंद्राच्या वतीने शहरात एकूण विविध ठिकाणी ४४ बुथ लावण्यात आले होते ३ हजार ८० बालक असून ३,६७२ डोस उपलब्ध झाले.

यावेळी प्रयास सखी मंच अध्यक्षा किरण बोढे, माजी जि.प. सभापती नितु चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्या वैशाली ढवस, आरोग्य सेविका किरण जुनघरे, सविता शेंडे, आरोग्य सेवक एस. डी. पावडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here