अखेर RCCPL MP BIRLA कंपणी प्रशासन कॉ.अनिल हेपट यांचे प्रखर नेत्रुत्वाच्या तेज धारेपुढे सातव्या दिवशी झुकले
,कामगारांच्या सर्व मागण्या मान्य.आज संपकरी कामगार कामावर परतले. मुकुटबन येथे काल रात्री झाला विजयाचा जल्लोष
वणी झरी — उपविभागातील मुकुटबन येथील कार्यरत RCCPL MP BIRLA या सिमेंट कंपनीमधिल काम करणारे कामगारांच्या समस्यांना घेऊन कामगार नेते कॉ.अनिल हेपट यांचे नेत्रुत्वात जनरल ईंडस्ट्रीज कामगार युनियन(आयटक) द्वारा दि.6 नोव्हें पासुन आंदोलन सुरू आहे. कालच्या सातव्या दिवसीही आंदोलन प्रखरतेने सुरु होते.जनतेचा वाढता पाठींबा बघता असि.लेबर कमिश्नर मा.प्रशांत सिंग यांनी काल सायंकाळी चंद्रपुर येथे कंपणी प्रशासनाला व युनियन प्रतिनिधींना पाचारण केले.असि.कमिश्नर यांनी कामगारांच्या मागण्या तपासल्या असता त्या रास्त व कायदेशिर असल्याचे कंपणीला सांगितले.कंपणीने जो आडमुठीपणा व मग्रुरपणा दाखविला त्यावर कमिश्नर यांनी कंपणीला चांगलेच धारेवर धरले आणी खडसावले.सोबतच कामगारांच्या सर्व मागण्या मान्य करून युनियनला संप मिटविण्याची विनंती केली.विशेष सागायचे म्हणजे कंपणीने युनियन अनधिकृत असल्याचा जो कांगावा केला होता तो चुकीचा होता कारण कमिश्नरने तपासणी केली असता जनरल ईंडस्ट्रिज कामगार युनियन हि राज्यव्यापी रजिस्टर नं.असलेली युनियन आहे व ति आयटकशी संलग्न असल्याने मान्यताप्राप्त आहे व युनियनने आपला अध्यक्षपदी कंपणी बाहेरचाही व्यक्ती ठेऊ शकतात हा युनियनचा कायदेशिर अधिकार आहे.त्यामुळे कामगारांच्या प्रश्नावर कंपणीने युनियनचे अध्यक्ष कॉ.अनिल हेपटशी बोलण्यास बाध्य आहे हे ही निष्पन्न झाले.असि.लेबर कमिश्नर यांनी घेतलेल्या कालच्या बैठकीत कंपणीचे व्यवस्थापन प्रतिनिधी व युनियनकडुन अध्यक्ष कॉ.अनिल हेपट,अनिल घाटे,पंढरी नांदेकर,प्रफुल्ल बद्रे,रोषन चामाटे,अक्षय पुल्लेवार,महादेव मेश्राम,उमाकांत मोहीतकर,राजु वरहाटे,विश्वनाथ साहु,निखील जुमनाके उपस्थित होते.कंपणीने सर्व मागण्या कमिश्नर समोर मान्य केल्याने काल सायंकाळी सतत सात दिवस चाललेले आंदोलन मिटले.आणी मुकुटबन शहरात कामगारांनी विजयाचा एकच जल्लोष केला.कामगार एकजुटीचा विजय असो,आयटक युनियन जिंदाबाद,कॉ.अनिल हेपट आगे बढो हम तुम्हारे साथ है,लाल झेंडा जिंदाबाद आदी घोषनांनी मुकुटबन शहर दनानुन सोडले.ढोल ताषांनी कामगारांच्या आंदोलनाचा विजयी जल्लोष केला.