Home Breaking News गावच्या व्यसनमुक्ती साठी भारीचे सरपंच लक्ष्मीकांत कोटनाके यांचा क्रांतिकारी निर्णय

गावच्या व्यसनमुक्ती साठी भारीचे सरपंच लक्ष्मीकांत कोटनाके यांचा क्रांतिकारी निर्णय

41

गावच्या व्यसनमुक्ती साठी भारीचे सरपंच लक्ष्मीकांत कोटनाके यांचा क्रांतिकारी निर्णय

सरपंच कोटनाके यांचा गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने सत्कार

नितेश केराम
जिवती / महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आणि राज्य शासनाकडून आकांक्षित तालुका म्हणून घोषित असलेल्या जिवती तालुक्यातील भारी या आंध्रप्रेदेश तेलंगना सीमेवर ग्रामपंचायतीचे सरपंच लक्ष्मीकांत कोटनाके यांनी एका क्रांतीकारी निर्णयाची घोषणा केली आहे
सरपंच कोटनाके यांनी गावच्या व्यसनमुक्ती साठी एक क्रांतीकारी निर्णय घेतला आहे त्यांच्या भारी ग्रामपंचायतीमध्ये सुमारे 2500 हजार लोकसंख्या आहे गावात शेतकरी शेतमजूरांचे अर्वाधिक वास्तव आहे त्यामुळे नशा करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने गावातील शांतता यामुळे भंग होतानाचे चित्र सरपंच कोटनाके यांच्या लक्षात येताच त्यांनी सलग एक महिना आणि त्या पुढील काळात नशा सोडणाऱ्या वेक्तीस तिरुपती बालाजी चे दर्शन स्व खर्चाने करण्याची घोषणा केली आहे त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाचे कौतुक सर्वदूर होताना दिसत आहे
सरपंच लक्ष्मीकांत कोटनाके दरवर्षी गावातील इतर मित्राना सोबत घेऊन स्वखर्चाने तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जातात नशा करून असलेली गावातील व्यक्ती गावाची शांतता भंग करताय नशे मुळे पती पत्नीच्या भांडनामुळे गावात कलहाचे वातावरण नेहमीच असते त्यामुळे गावात नशा मुक्त करणे आमचे सर्वांत मोठे ध्यय आहे त्यासाठी या निर्णय घेत आम्ही एक पाहुल पुढे टाकले आहे माझ्यावर तिरुपती बालाजीची कृपा सदैव आहे परंतु गावातील तरुण वर्गापासून इतरही लोकांमध्ये नशेचे प्रमाण असल्यामुळे त्यांचा आर्थिक सामाजिक विकास त्यामुळे रोखला गेला आहे यासाठी त्यांना नशा मुक्त करणे सर्वात महत्वाचे असल्याने गावाला आणि पर्यायाने गावाकऱ्याने नशा मुक्त करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेत असल्याचे मत भारी ग्रामपंचायतीचे सरपंच लक्ष्मीकांत कोटनाके यांनी व्यक्त केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here