Home Breaking News वाढत्या उन्हामुळे शाळा महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंत ठेवा

वाढत्या उन्हामुळे शाळा महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंत ठेवा

93

वाढत्या उन्हामुळे शाळा महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंत ठेवा



जिल्हाधिकारी वसुमना मंत यांनी निर्गमित केले आदेश


नितेश केराम
चंद्रपूर दि 19 जिल्ह्यात सद्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दुष्टीने महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे 11 मार्च 2026 रोजी आयोजित बैठकीत शिक्षणाधिकारी ( प्राथमिक / माध्यमिक ) जिल्हा परिषद यांना शाळा सकाळ सत्रात घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते
सद्या चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमान 44 अंश सेल्सीअसच्या वर पोहॊचले आहे दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विध्यार्थी यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे विशेषत उष्माघात व इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका लक्षात घेता विध्यार्थी यांची सुरक्षितता अंत्यन्त महत्वाची ठरत आहे
दुपारच्या कडक उन्हात शाळा सुटल्यानंतर विध्यार्थी यांना घरी जाताना होणारा त्रास टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या शासकीय अनुदानित व खासगी शाळा व महाविद्यालयांच्या वेळामध्ये तात्पुरता बद्दल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार सर्व शैक्षनिक संस्था सकाळच्या सत्रात सुरु करून जास्तीत जास्त सकाळी 11 वाजेपर्यंत सोडण्याबाबत संबंधित निर्देश देण्यात आले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here