Home Breaking News सावधान कोरपना परिसरात फोन पे च्या नावाखाली गंडा कॅश घेऊन खात्यातून पैसे...

सावधान कोरपना परिसरात फोन पे च्या नावाखाली गंडा कॅश घेऊन खात्यातून पैसे गायब करणाऱ्या टोळीची सूळसुळाट

383

सावधान कोरपना परिसरात फोन पे च्या नावाखाली गंडा कॅश घेऊन खात्यातून पैसे गायब करणाऱ्या टोळीची सूळसुळाट



तात्काळ कारवाई करण्याची नागरिकांची मागणी सायबर भामट्याच्या नवीन फ़ंडा मुळे सर्वसामान्य हैराण


नितेश केराम

कोरपना तालुक्यातील गेल्या काही दिवसांपासून साबयर गुन्हेगारांनी उच्छाद मांडला असून विशेषत फोन पे आणि ऑनलाईन ट्राजेक्शच्या नावाखाली सर्वसामान्यांना लुटण्याचे प्रकार मोट्या प्रमाणात वाढले आहे पैसे रोख घ्या आणि माझ्या खात्यातून तुमच्या खात्यावर ट्रान्सफर करतो असे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याने परिसरात खळबळ माजली आहे मिळालेल्या माहिती नुसार हे सायबर भामटे अंत्यन्त चलाखीने आपली जाळी विनतात एखाद्या वेक्तीला गाठून माझ्याकडे कॅश शिल्लक आहे ती तुमी घ्या आणि तेवढेच पैसे माझ्या अकाउंटवर किंवा अन्य एका नंबरवर फोन पे करा अशी विनंती केली जाते सोमोरील वेक्ती विश्वासाने व्यवहार करते मात्र दुसऱ्याच दिवशी किंवा काही तासांत संबंधित वेक्तीला बँक खात्यातून पैसे परस्पर मायनस किंवा गायब होत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत तांत्रिक बाबीचा गैरफायदा घेऊन हे भामटे लोकांना कष्टiची कमाई लंपास करत आहे

अनेकांना बसला फटका कोरपना शहर आणि परिसरातील अनेक सुशिक्षित तरुण आणि व्यापारी या प्रकरणाला बळी पडले आहे वेव्हार पूर्ण झाल्याचा sms मोबाईलवर येतो पण प्रत्यक्षात बँकेतून पैसे वळते केले जातात एकदा पैसे गायब झाले की संबंधित आरोपीचा पत्ता लागत नाही ज्यामुळे पीडित नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे

या वाढत्या सायबर क्राईममुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे सायबर सेलने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन अशा टोळ्याना तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे अनोळखी वेक्तीसोबत ऑनलाईन पैशांचे वेव्हार करतात नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहनही सामाजिक कार्यकर्त्यांकडून केले जात आहे

कुठंल्याही अनोळखी वेक्तीकडून पैसे कॅश घेऊन आपल्या खात्यातून ऑनलाईन व्यवहार करणे धोक्याचे ठरु शकते अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here