जुलैपर्यंत मुदत तालुका कृषी अधिकारी गोविंद ठाकूर यांचे आवाहन
नितेश केराम
प्रधानमंत्री पीकविमा योजने अंतर्गत सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीफ हंगाम 2026 साठी लागू करण्यात आली त्यासाठी कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी 31 जुलै पर्यंत पीक विमा नोंदणी पूर्ण करावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी गोविंद ठाकूर यांनी केले आहे
प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात खरीफ हंगाम 2016 पासून राबविण्यात येत आहे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना नुसार खरीफ 2026 व रबी 2026 27 या एक वर्षाच्या कालावधीसाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना कप मॉडलनुसार राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला ही योजना अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित पिकासाठी विमा क्षेत्र घटक या त्वावर राबविण्यात येणार आहे चंद्रपूर जिल्ह्यासाठी खरीफ हंगाम 2026 व रबी हंगाम 2026
डिजिटल पीक सर्वेक्षण अंतर्गत पिकाची नोंद करणे बंधनकारक राहील
प्रतिअर्ज किमान 0,10 हेक्टर क्षेत्र मर्यादा राहील
27 करिता योजनेची अंमलबजावणी पुणे येतील इप्फो टोकीयो जनरल एन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्यामार्फत करण्यात येत आहे तरी कोरपना तालुक्यातील जास्तीत कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी योजना इच्छिक आहे
भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी देखील योजनेत सहभागी होऊ शकतात
भाडेकरार पीकविमा संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे
शेतकऱ्यांना विमा हप्ता खरीफ पीकांसाठी 2 टक्के रब्बी पिकांसाठी 1,5 टक्के नगदी पिकांसाठी 5 टक्के मर्यादित बोगस फसवणुकीच्या उद्देशाने विमा घेतल्याचे आढळल्यास संबंधित शेतकऱ्यास कृषी विभागाच्या दिबीटी आधारित योजनांचा लाभ पाच वर्षासाठी बंद करण्यात येईल
जास्त शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अंतिम मुदतीपूर्वी नोंदणी करून सहभागी व्हावे असे आवाहन ठाकूर यांनी केले